Home /News /coronavirus-latest-news /

योगगुरू बाबा रामदेव यांच्या Patanjali मध्ये घुसला कोरोना; 83 जण पॉझिटिव्ह

योगगुरू बाबा रामदेव यांच्या Patanjali मध्ये घुसला कोरोना; 83 जण पॉझिटिव्ह

बाबा रामदेव (Baba ramdev) यांच्या पतंजली योगपीठात (Patanjali yogpeeth) कोरोनाने शिरकाव केला आहे.

    हरिद्वार, 22 एप्रिल : देशभर कहर माजवणाऱ्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus) आता बाबा रामदेव (Baba ramdev) यांच्या पतंजली (Patanjali) योगपीठावरही हल्ला केला आहे. पतंजली योगपीठात (Patanjali yogpeeth) कोरोनाने शिरकाव केला आहे.  हरिद्वारमधील पतंजली योगपीठात 83 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पतंजली योगपीठच्या अनेक संस्थांमध्ये दर दिवशी कोरोना रुग्ण मिळत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. असे एकूण  83 जण कोरोनाग्रस्त असल्याचं समजलं आहे. त्यांना आयसोलेट करण्यात आलं आहे. आता संस्थेथील इतर लोकांसह बाबा रामदेव यांचीही कोरोना टेस्ट केली जाऊ शकते. हरिद्वारमधील सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी सांगितलं, 10 एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये 83 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. या कोरोना रुग्णांना पतंजली परिसरात आयसोलेट करण्यात आलं आहे. गरज पडल्यास बाबा रामदेव यांचीही कोरोना टेस्ट केली जाईल. हे वाचा - पोटावर झोपल्याने खरंच शरीरातील Oxygen पातळी वाढते का? काय सांगतात तज्ज्ञ पाहा बाबा रामदेव यांनी कोरोनावर औषधही आणलं होतं. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे औषध खूप फायद्याचं ठरेल, असा दावाही त्यांनी केला होता. हे औषध वादातही सापडलं होतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Baba ramdev, Coronavirus

    पुढील बातम्या