नवी दिल्ली, 5 एप्रिल : संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्ग वाढत आहे. अशातच दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ तबलिदी जमातच्या कार्यक्रमामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात याचे मुख्यालय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मरकझच्या इमारतीच्या उभारणीत नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. या प्रकरणात दक्षिण दिल्ली नगर निगम (SDMC) कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मरकझची इमारत दोन प्लॉट जोडून बनवण्यात आली आहे. मात्र तरीही येथे सात मजल्याची इमारत बांधण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केवळ दोन मजली इमारतीची नकाशा पास करण्यात आला होता, याशिवाय या इमारतीचा हाऊस टॅक्सही भरण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत तबलिगी इमारतीवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित - …आणि कोरोनासाठी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विकायला काढलं, OLX वरील पोस्टनंतर धावाधाव दक्षिण दिल्ली नगर निकमनुसार पहिल्यांदा या जागी केवळ एक मशीद होती. त्यानंतर येथे एक मदरसा बनविण्यात आला. मात्र त्यानंतर येथे इमारत उभारण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दक्षिणी दिल्ली नगर निगम या इमारतीसंबंधित दस्ताऐवज शोधत आहेत. सूत्रानुसार या इमारतीला तोडण्याची सर्व कागदोपत्री कारवाई सुरू करण्यात आली आहे. संबंधित - 433/748…राज्याच्या एकूण कोरोनाबाधितांमधील 57% रुग्ण केवळ मुंबईत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.