जाहिरात
मराठी बातम्या / देश / महाराष्ट्राच्या घडामोडींमध्ये राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरला, यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा

महाराष्ट्राच्या घडामोडींमध्ये राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरला, यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा

महाराष्ट्राच्या घडामोडींमध्ये राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरला, यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा

शरद पवारांनाही याबाबत विचारण्यात आलं होतं, मात्र त्यांनी हे नाकारलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जून : देशाचे नव्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत (New presidential election) राजकीय समीकरणांना गती आली आहे. राष्ट्रपदी पदाच्या उमेदवारावर सर्वांचं लक्ष आहे. अशात विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार (Opposition candidate Yashwant Sinha for the post of President) म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यशवंत सिन्हा आज दिल्लीत राष्ट्रपती  पदाच्या उमेदवार निवडणुकीसाठी विपक्षाच्या बैठकीत भाग घेणार आहेत. या बैठकीत सामील होण्यापूर्वी यशवंत सिन्हा यांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं की, टीएमसीने मला जो सन्मान आणि प्रतिष्ठा दिली त्यासाठी मी ममता बॅनर्जी यांचा आभारी आहे. आता ती वेळ आली आहे, जेथे मला राष्ट्रीय उद्देशासाठी विपक्षी एकतेसाठी काम करायचं आहे. मला विश्वास आहे की, पार्टी माझ्या या निर्णयाचा स्वीकार करेल.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, टीएमसी आज होणआऱ्या विपक्षाच्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीत उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करतील. तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात चर्चा केल्यानंतर सिन्हा यांच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात