Home /News /maharashtra /

UNLOCK च्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत नोकरदारांचे हाल, बससाठी रांगाच रांगा!

UNLOCK च्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत नोकरदारांचे हाल, बससाठी रांगाच रांगा!

पहिल्याच दिवशी अपुऱ्या बस सेवेमुळे राज्य सरकारच्या उपाय योजनेचा फज्जा उडाला आहे.

    डोंबिवली, 08 जून : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं होतं. आता पाचव्या टप्प्यात आजपासून लॉकडाउन अनलॉक करण्याच्या प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून केला जात आहे. सर्व कार्यालये आणि मंदिरासह बाजारपेठा उघडण्यास मुभा दिली आहे. पण डोंबिवलीत आज सकाळी नोकरदारांच्या प्रचंड गर्दीचे चित्र पाहण्यास मिळाले. डोंबिवली नोकरदार वर्गाचे लोकल बंद असल्याने आणि अतिशय अपुऱ्या बस सेवेमुळे प्रचंड हाल होत आहेत. आज पासून अनेक सरकारी व खासगी कार्यालयात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयात जाण्यासाठी नोकरदार वर्गाने गर्दी केली आहे. डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसरात चाकरमान्यांची प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली आहे. बस पकडण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या आहे.  नोकरदारांची ही राग फडके रोड परिसरात पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिवा शहरातील नोकरदार वर्गही कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडला आहे. बस पकडण्यासाठी नोकरदारांची मोठी गर्दी झाली असून लांबच्या लांब रांगा लागल्या आहे. पहिल्याच दिवशी अपुऱ्या बस सेवेमुळे राज्य सरकारच्या उपाय योजनेचा फज्जा उडाला आहे. आज सोमवारपासून मुंबई हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली होती. पण, बसेसचे अपुरे नियोजन असल्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.  त्यामुळे चाकरमान्यांनी कार्यालयाला जायचे कसे ? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. कल्याण शीळ महामार्गावरही सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या