Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

CCTV VIDEO: बॅडमिंटन खेळताना आला हृदयविकाराचा झटका, पोलिसाचा जागीच मृत्यू

CCTV VIDEO: बॅडमिंटन खेळताना आला हृदयविकाराचा झटका, पोलिसाचा जागीच मृत्यू

आंध्रप्रदेशमधून एक विचलित करणारी बातमी समोर आली आहे. बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका पोलीस इन्स्पेक्टरचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

पश्चिम गोदावरी, 24 मार्च: आंध्रप्रदेशमधून एक विचलित करणारी बातमी समोर आली आहे. बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका पोलीस इन्स्पेक्टरचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांच्या साथीदारांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. गण प्रसाद पोलीस ठाण्यामध्ये भगवान प्रसाद तैनात होते. सीसीटीव्हीतील दृश्यात आपण पाहू शकतो की काही वेळासाठी भगवान यांच्या हालचारी बदलल्या होत्या. त्यानंतर ते धाडकन जमिनीवर कोसळले. इतर सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा देखील प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता.

सोशल मीडियावर हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. प्रसाद यांच्याबरोबर अशी दुर्देवी घटना घडल्याने परिसरात दु:खाचं वातावरण आहे. भगवान प्रसाद 45 वर्षांचे होते.

व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार प्रसाद सुरुवातीला खेळत होते. खेळता खेळता ते खाली वाकले आणि धाडकन जमिनीवर कोसळले. ही घटना त्यांच्या सहकाऱ्यांसाठी देखील अत्यंत धक्कादायक होती.

First published:

Tags: Andhra pradesh, Badminton, Cctv footage, Death, Heart Attack, Police, Shocking news, Sports