Home /News /national /

...आणि कोरोना योद्धा गहिवरला, सहकारीच झाले कुटुंबीय; वाढदिवशी रस्त्यावरच केक कापून दिल्या शुभेच्छा

...आणि कोरोना योद्धा गहिवरला, सहकारीच झाले कुटुंबीय; वाढदिवशी रस्त्यावरच केक कापून दिल्या शुभेच्छा

कोरोना योद्ध्यांच्या कामाला तोड नाही. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम!

    भोपाळ, 6 मे : आपल्या घरापासून लांब ड्यूटी करणाऱ्या कोरोना योद्ध्यांनाही (Corona Warriors) त्यांच्या घरच्यांची आठवण येते. गेल्या 40 दिवसांपासून दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या या कोरोना योद्ध्याला वाढदिवशी मिळालेलं सरप्राईज पाहून ते भावूक झाले. भोपाळमधील टीटी परिसरात अशाच एक प्रसंग समोर आला आहे. जेव्हा टीटी पोलीस ठाण्यातील एका पोलिसाचा वाढदिवस त्याच्या सहकार्यांनी मिळून साजरा केला. ड्यूटीवर असल्याने त्यांनी भररस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा केला. मनोज दवे असं या कोरोना योद्ध्याचं नाव आहे. सहकाऱ्यांनी दिलेल्या या सरप्राईजमुळे त्यांचे डोळे भरुन आले. मनोज दवे यांना आपल्या वाढदिवशी कुटुंबाची आठवण आली. दरवर्षी ते आपला वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करतात. मात्र यंदा त्यांच्यापुढे देशसेवेचं लक्ष्य आहे. त्यामुळे ते घरी जाऊ शकले नाही. फोनवरुनच ते पत्नी आणि मुलांशी बोलले. जेव्हा त्यांनी आपला वाढदिवस साजरा केल्याचे काही फोटो घरच्यांना पाठवले, तेव्हा कुटुंबीयांना खूप आनंद झाला. मात्र दुसऱ्याच क्षणाला आज आपले कुटुंबीय सोबत नाही या विचाराने त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. येथे वाढदिवस साजरा करताना सोशल डिस्टन्सिंगची योग्य ती काळजी घेण्यात आली होती. आज देशभरात लाखो कोरोना योद्धा नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नर्सेस, डॉक्टर, कर्मचारी स्वत:च्या जीवची पर्वा न करता कोरोनाच्या रुग्णांची सेवा करीत आहेत. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचे पालन व्हावे यासाठी पोलीस दिवस-रात्र ड्यूटीवर आहेत. संबंधित -पश्चिम बंगालच्या मजुरांची फरफट; 2400 जणांना स्वीकारण्यास ममता सरकारचा नकार परदेशातील तबलिगी दिल्लीपर्यंत कसा करीत होते प्रवास? धक्कादायक माहिती आली समोर
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या