परदेशातील तबलिगी दिल्लीपर्यंत कसा करीत होते प्रवास? गुन्हे शाखेच्या हाती लागली धक्कादायक माहिती
परदेशातील तबलिगी दिल्लीपर्यंत कसा करीत होते प्रवास? गुन्हे शाखेच्या हाती लागली धक्कादायक माहिती
या जमातीचं मुख्यालय अर्थात हेडक्वार्टर ‘बंगलेवाली मस्जिद’ जिला निजामुद्दीन मर्कझ म्हटलं जातं या ठिकाणी आहे. हे त्यांचं ग्लोबल सेंटर आहे. जगातल्या 150 देशात या जामातीचे लोक राहतात. 15 ते 25 कोटी लोक या जमातीचं आचरण करतात.
गुन्हे शाखेला ही माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी मौलाना साद यांची चौकशी अधिक कडक केली आहे.
नवी दिल्ली, 6 मे : निजामुद्दीन स्थित मरकज प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला (Crime Branch) तबलिगी जमातींशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. कोरोनाच्या संकटात तबलिगी जमातने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. या कार्यक्रमात देश व परदेशातील हजारो जमाती सहभागी झाले होते. त्यामुळे देशावर कोरोनाची संख्या वाढण्याचं संकट घोंघावत होतं.
सध्या गुन्हे शाखेकडून जमातींची कडक चौकशी केली जात आहे. मरकजशी संबंधित काही परदेशी सदस्य चार्टर्ड प्लेनच्या साहाय्याने दिल्लीत ये-जा करीत होते. मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर काही परदेशी जमाती चार्टर्ड प्लेनने आपल्या देशात परतले होते. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेने मौलाना सादवरील तपास अधिक कडक केला आहे. सध्या चार्टर्ड प्लेनने दिल्लीतून येणाऱ्या –जाणाऱ्या परदेशी जमातींबाबत माहिती जमा केली जात आहे.
दुसरीकडे मौलाना साद यांचा मुलगा सईदकडून काही कागदपत्रही जमा केली जात आहेत. जमातींना येथे आणण्याचा आणि प्रवासाबाबत संबंधित कागदपत्र जमा केले जात आहे. याशिवाय मौलाना साद यांना एम्स वा आरएमएलमध्ये कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ED कडून जमातीच्या 9 जणांचा चौकशी
काही दिवसांपूर्वी ईडीने हवालाच्या रकमेसंदर्भात नोटीस पाठविली आहे. यामध्ये एक कथित हवाला ऑपरेटर आहे. तो हवालाची रक्कम इथून तिथे पोहोचविण्याचं काम करीत होता. या व्यक्तीसह मौलाना साद यांनाही ईडीने नोटीस पाठवली आहे.
संबंधित -हिज्बुलच्या कमांडर रियाझ नायकू खात्मा; गणिताचा शिक्षक कसा झाला क्रूरकर्मा?आता या तिसऱ्या लॉकडाऊननंतर काय? सोनिया गांधींचा मोदींना थेट सवाल
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.