मराठी बातम्या /बातम्या /देश /मराठमोळ्या तरुणाची कमाल! अनोख्या स्टार्टअपसाठी थेट आनंद महिंद्रांनी दिली कोट्यवधींची ऑफर; वाचा सविस्तर

मराठमोळ्या तरुणाची कमाल! अनोख्या स्टार्टअपसाठी थेट आनंद महिंद्रांनी दिली कोट्यवधींची ऑफर; वाचा सविस्तर

विशेष म्हणजे कचऱ्यापासून शूज निर्मिती (making of shoes with help of garbage) करणारं ही स्टार्टअप एका मराठी व्यक्तीचं आहे.

विशेष म्हणजे कचऱ्यापासून शूज निर्मिती (making of shoes with help of garbage) करणारं ही स्टार्टअप एका मराठी व्यक्तीचं आहे.

विशेष म्हणजे कचऱ्यापासून शूज निर्मिती (making of shoes with help of garbage) करणारं ही स्टार्टअप एका मराठी व्यक्तीचं आहे.

मुंबई, 20 नोव्हेंबर: आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या काळात अशक्य असं काहीही नाही. जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता असेल तर सर्व काही शक्य आहे. जगात जशी टेक्नॉलॉजी पुढे जात आहे त्याच पद्धतीनं विज्ञानाच्या (Science and Technology) क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. अशाच एका नवीन स्टार्टअपला (Thaely Startup) चक्क आनंद महिंद्रा (Anand Mahindra appreciate marathi student) यांनी कोट्यवधींची ऑफर दिली आहे. विशेष म्हणजे कचऱ्यापासून शूज निर्मिती (making of shoes with help of garbage) करणारं ही स्टार्टअप एका मराठी व्यक्तीचं आहे.

आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असतात. तसंच काही प्रेरणादायी स्टोरीजही पोस्ट करत असतात. नुकतीच आनंद महिंद्रा यांनी आशय भावे यान तेवीस वर्षीय मराठमोळ्या तरुणाच्या एका स्टार्टअपबद्दल पोस्ट केली आहे. या आशयनं कचऱ्यापासून शूजनिर्मितीचं शर्टात सुरु केलंय. याबद्दलची माहिती मिळताच आनंद महिंद्रा यांनी त्याच्या स्टार्टअपसाठी कोट्यवधींची ऑफर दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी याबद्दलचं ट्विट केलं आहे. एक फोटो पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. " या प्रेरणादायी स्टार्टअपबद्दल याआधी माहिती नसल्याची खंत वाटते. मी या शूजची एक जोडी नक्की खरेदी करणार आहे. अशा स्टार्टअपना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. जेव्हा या स्टार्टअप साठी फंड गोळा कराल तेव्हा आमचाही विचार करा" असं महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

आनंद महिंद्रा यांची Cryptocurrency मध्ये गुंतवणूक? काय आहे सत्य?

काय आहे 'थैली'

आशय भावे (Ashay Bhave Startup) यांनी जुलै 2021 मध्ये हा स्टार्टअप सुरू केला. 'Thaely' असं त्याचं नाव आहे. कंपनीनं 50 हजारांहून अधिक प्लास्टिक पिशव्या आणि 35 हजार प्लास्टिक बाटल्यांमधील साहित्याचा पुनर्वापर केला आहे. 2017 मध्ये बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA) चे शिक्षण घेत असताना भावे यांना या व्यवसायाची कल्पना सुचली. हा त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासूनचा एक प्रोजेक्ट होता, ज्यावर त्यानं काम केलं. आता या तरुण उद्योजकाची कल्पना यशस्वी बिझनेस मॉडेल बनली आहे. सध्या, कंपनी शूजच्या मार्केटमध्ये Nike आणि Puma सारख्या ब्रँडच्या तुलनेत लहान दिसत आहे, परंतु कंपनीची लवकरच युरोप आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत आपले प्रोडक्ट्स लाँच करण्याची योजना आहे.

एकूणच काय तर मराठमोळ्या तरुणाला थेट आनंद महिंद्रांकडून मिळालेल्या शाब्बासकीमुळे भविष्यात मोठा फायदा होणार आहे, तसंच तरुण वयात भारतातील एक स्टार्टअप आंतरराष्ट्रीय बाजारात भरारी घ्यायला मोकळं होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Startup, Startup Success Story