मराठी बातम्या /बातम्या /मनी /आनंद महिंद्रा यांची Cryptocurrency मध्ये गुंतवणूक? काय आहे सत्य?

आनंद महिंद्रा यांची Cryptocurrency मध्ये गुंतवणूक? काय आहे सत्य?

सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत असलेल्या बातम्यांमध्ये असं सांगण्यात आलं आहे, की आनंद महिंद्रा यांनी ऑटो ट्रेडिंग प्रोग्राम बिटकॉइन (Bitcoin) एरा नावाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत असलेल्या बातम्यांमध्ये असं सांगण्यात आलं आहे, की आनंद महिंद्रा यांनी ऑटो ट्रेडिंग प्रोग्राम बिटकॉइन (Bitcoin) एरा नावाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत असलेल्या बातम्यांमध्ये असं सांगण्यात आलं आहे, की आनंद महिंद्रा यांनी ऑटो ट्रेडिंग प्रोग्राम बिटकॉइन (Bitcoin) एरा नावाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे.

  मुंबई, 20 नोव्हेंबर : सध्या क्रिप्टोकरन्सीच्या (Crypto Currency) वाढत्या वापराबाबत देशात आणि जगभरातही चिंता व्यक्त होत आहे. जगात क्रिप्टोमधली सर्वाधिक गुंतवणूक भारतात होत आहे. यामुळे सरकारने त्यावर अंकुश ठेवण्याबाबत पावलं उचलण्यास सुरुवात केली असून, नुकत्याच झालेल्या सिडनी डायलॉगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करू शकणाऱ्या या करन्सीच्या गैरवापराबाबत दक्षता घेण्याचं आवाहन जगाला केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातले एक प्रख्यात उद्योजक, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली असल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ही बातमी व्हायरल होत आहे. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून आनंद महिंद्रा यांनी काही काळातच मोठा नफा कमावल्याचंही या बातमीत म्हटलं आहे. आनंद महिंद्रा यांनी मात्र हे वृत्त पूर्णपणे बनावट (Fake) असल्याचं म्हटलं असून, आपण क्रिप्टोकरन्सीमध्ये एक रुपयाही गुंतवला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

  सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत असलेल्या बातम्यांमध्ये असं सांगण्यात आलं आहे, की आनंद महिंद्रा यांनी ऑटो ट्रेडिंग प्रोग्राम बिटकॉइन (Bitcoin) एरा नावाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीतून त्यांनी ऑटो पायलट मोडमध्ये लाखो डॉलर्स कमावले आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर या फेक न्यूजला टॅग करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेली ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं नमूद केलं आहे. बनावट बातम्यांचा हा एक नवीन प्रकार असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.

  घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का; बिल्डर्स घरांच्या किमती वाढवण्याच्या तयारी

  अशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवून लोकांची दिशाभूल करणं (Misleading People) ही चुकीची प्रवृत्ती असून, देशातल्या कोट्यवधी जनतेची ही मोठी फसवणूक आहे. हा ट्रेंड अतिशय धोकादायक असल्याचंही आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विटरवरच्या आपल्या पोस्टमध्ये असंही लिहिलं आहे की, 'मला याबाबत काहीही माहिती नाही. ही बातमी कोणी पाहिली तर मला पाठवावी. हा खरोखरच अनैतिक व्यवहार आहे. मी क्रिप्टोकरन्सीमध्ये एक रुपयाही गुंतवलेला नाही. आणि या बातमीत असं सांगण्यात आलं आहे, की बिटकॉइन एरा नावाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून कोणतीही व्यक्ती तीन-चार महिन्यांत करोडपती बनू शकते. अशा बातम्या लोकांनी गांभीर्याने घेऊ नयेत.'

  यशोगाथा: 27 व्या वर्षी 10 हजार कमावणारे विजय शेखर यांची आताची कमाई थक्क करणारी

  आनंद महिंद्रा यांच्याबाबत अशा बनावट बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्याविषयी अनेकदा बनावट बातम्या सोशल मीडियावर पसरल्या आहेत. अशा बातम्या पसरवणाऱ्या व्यक्तींनी अनेकदा त्यांना लक्ष्य केलं आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, आनंद महिंद्रा माध्यमविषयक अभ्यासक्रमात शेअर बाजार ट्रेडिंग विषयाच्या समावेशाचं समर्थन करत असल्याची बातमी व्हायरल झाली होती.


  First published:
  top videos

   Tags: Anand mahindra, Cryptocurrency