मुंबई,19 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबूक पेजवर नवे व्यंगचित्र पोस्ट केलंय. या व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजची खिल्ली उडवलीय.
राज यांच्या व्यंगचित्राच्या दुसऱ्या भागात देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिक म्हणून दाखवलेलं झाड जातीपातीच्या विषवल्लींनी वेढलंय. या झाडाकडे बघून मराठी माणूस फडणवीसांना जातीपातीच्या विषवल्ली छाटण्याचे आवाहन करताना दिसताहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.