ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी झेप घेतली. भारताने चारपैकी तीन सामने जिंकले तर एक सामना पावसामुळे रद्द झाला.
सध्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी आहे. दोघांचे अनुक्रमे 8 आणि 7 गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत.
भारताच्या विजयाने इंग्लंड चौथ्या स्थानावर गेले आहे. लंकेला पाचपैकी दोन सामन्यात पावसाने दणका दिला तर दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे स्पर्धेत त्यांचे 4 गुण झाले आहेत.
लंकेनंतर सहाव्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा नंबर लागतो. त्यांचे तीन गुण झाले असून त्यांना पाचपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यांच्यानंतर सातव्या स्थानी बांगलादेश असून त्यांचेसुद्धा 3 गुण झाले आहेत. बांगलादेशने 4 सामने खेळले असून त्यात एक विजय दोन पराभव आणि एक सामना पावसाने रद्द झाला.
पाकिस्तानला भारताविरुद्धच्या पराभवाने गुणतक्त्यात सातव्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. त्यांचे पाच सामन्यात 3 पराभव झाले असून केवळ एक विजय मिळवता आला आहे. त्यांचाही एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला अद्याप खाते उघडता आलेलं नाही. चारपैकी चार सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमधील पुढची वाटचाल कठीण झाली आहे.
पाकिस्तानचे पुढचे सामने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याशी होणार आहेत. यात त्यांचा एका सामन्यात जरी पराभव झाला तरी त्यांचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात येऊ शकते.