VIDEO : INDvsPAK : 25 चेंडूत बाजी पलटली, कुलदीप-पांड्याने केली कमाल!

VIDEO : INDvsPAK : 25 चेंडूत बाजी पलटली, कुलदीप-पांड्याने केली कमाल!

ICC Cricket World Cup 2019 : India vs Pakistan : चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि हार्दीक पांड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट घेऊन पाकचा निम्मा संघ तंबूत धाडला.

  • Share this:

मँचेस्टर, 16 जून : ICC Cricket World Cup 2019 स्पर्धेत भारत आणि पाक यांच्यातील महामुकाबल्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय त्यांना महागात पडला. भारताने 50 षटकांत 336 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विजय शंकरने पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकला बाद करून पहिला धक्का दिला. त्यानंतर फखर जमान आणि बाबर आझम यांनी 104 धावांची भागिदारी केली. ही जोडी चायनामन गोंलदाज कुलदीप यादवने फोडली. त्याने दोघांनाही बाद केलं. फखर जमानने 62 धावा केल्या तर बाबर आझम 48 धावांवर बाद झाला. त्यानंतर चहलला ब्रेक देऊन विराटने हार्दीक पांड्याकडे चेंडू सोपवला.

पांड्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत एकाच षटकात पाकच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. एकवेळ पाकिस्तान 1 बाद 117 धावांवर असताना पुढचे 4 फलंदाज 12 धावांमध्ये तंबूत परतले. पांड्याने मोहम्मद हाफीजला 9 धावांवर तर शोएब मलिकला शून्यावर बाद केलं. त्यानंतर पाकिस्तानची धावगती कमी झाली.


तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्यानं त्याच्या जागी खेळणाऱ्या केएल राहुलनं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल 57 धावांवर बाद झाला. त्याने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने शतक साजरं केलं. रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले.

रोहित शर्माने 85 चेंडूत शतक पूर्ण केलं. याखेळीत रोहित तीनवेळा धावबाद होण्यापासून वाचला. त्यानंतर पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा आणि दिशाहीन गोलंदाजीचा रोहितने समाचार घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या 20 षटकांत एकदाही पायचितचे अपिल केलं नाही. त्यांना तशी संधीच भारतीय फलंदाजांनी दिली नाही. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताच्या 2 बाद 238 धावा झाल्या होत्या त्यानंतर मोहम्मद आमीरने भारताला तीन धक्के दिले. त्याने पांड्या, कोहली आणि धोनीला बाद केले. यामुळे अखेरच्या षटकात भारताच्या धावांना ब्रेक लागला.


रोहितनं उतरवली पाकची नशा, हायवोल्टेज सामन्यात झंझावती शतक

यांनी 147 धावांची भागिदारी केली होती. त्यानंतर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये वॉर्नर-फिंच यांनी 146 धावा केल्या होत्या. World Cup India vs Pakistan: येथे पाहा महामुकाबला Live


VIDEO: World Cup: IND vs PAK; 'या' कलाकरांनी शेअर केला वर्ल्ड कपचा धम्माल अनुभव


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 10:36 PM IST

ताज्या बातम्या