नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : अफगाणिस्तानातील राजकीय उलथापालथीनंतर (Afghanistan crisis) जगभरातील देशाचं लक्ष दोन देशांकडे लागलं आहे. एक अर्थातच अमेरिका आणि दुसरा भारत. तालिबान या कट्टरवादी संघटनेने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्यानंतर जागतिक राजकारणावर त्याचा पडसाद उमटत आहेत. अमेरिकेने 30 ऑगस्ट 2021 ला अफगाणिस्तानातील (US Army returns from Afghanistan) आपलं सैन्य परत नेल्यानंतर तर अफगाणिस्तानाची परिस्थिती आणखी भयावह झाली आहे. या सर्व परिस्थिती अफगाणिस्तानचा शेजारी देश असलेल्या भारतालाही दहशतवादाचा धोका आणखी वाढल्याचं जाणवू लागलं आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकी गुप्तचर संस्था सेंट्रल इंटिलिजन्स एजन्सीचे (Central Intelligence Agency’s CIA) प्रमुख विल्यम बर्न्स (CIA chief William Burns) यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Adviser Ajit Doval) अजित डोवाल (Ajit Doval) यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली आहे. या भेटीला खूप महत्त्व आहे.
काबुलमध्ये पाकिस्तानविरोधी रॅलीवर तालिबानचा बेधुंद गोळीबार
सूत्रांनी न्यूज18 ला दिलेल्या माहितीनुसार बर्न्स यांनी डोवाल यांची भेट घेतली. अमेरिकी सैन्य परतल्यानंतर आता भारतीय उपखंड आणि अफगाणिस्तानातील गुप्तचरांनी दिलेली माहिती अमेरिकेला पुरवण्यामध्ये (Sharing Intelligence) भारताने महत्त्वाची भूमिका बजावावी असं आम्हाला वाटतं असं बर्न्स यांनी डोवाल यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमेरिकेच्या भारताला दोन विनंत्या
या सूत्रांनी सांगितलं की भारताने जेवढी जास्तीत जास्त अफगाणिस्तानातील स्थानिक पातळीवरची गुप्त माहिती देता येईल तेवढी द्यावी आणि काही अफगाणिस्तानी नागरिकांना भारतात शरण द्यावं (share “maximum possible ground intelligence", and “give shelter to some Afghans") अशा दोन विनंत्या बर्न्स यांनी डोवाल यांना केल्या आहेत.
अफगाणिस्तानच्या गृहमंत्र्याची माहिती द्या आणि कमवा 50 लाख डॉलर: अमेरिका
भारत सरकारमध्ये उच्चपदावर काम करणाऱ्या या अधिकाऱ्याना न्यूज 18 ने विचारलं असता आम्ही या बैठकीतील कुठल्याही चर्चेबाबत होकारार्थी किंवा नकारार्थी माहिती देऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण दिलं. द हिंदू या वृत्तपत्राने अमेरिकी गुप्तचर संस्था आणि संरक्षण विषयातील अधिकारी भारत दौऱ्यावर असल्याचं वृत्त दिलं आहे.
बर्न्स यांच्या अध्यक्षतेखालील अमेरिकी अधिकाऱ्यांचं हे दल पाकिस्तानलाही भेट देणार आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आणि अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि तिथल्या तालिबानी सरकारची स्थापना या विषयांच्या अनुषंगाने अनेक विषयांवर डोवाल यांच्याशी चर्चा केल्याचं द हिंदूच्या वृत्तातही म्हटलं आहे.
एके काळी भारतातून लंडनपर्यंत जायची बस; काबुल, हेरातकडून जाणारा मार्ग कायमचा बंद
भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चं जगभर जाळं पसरलेलं (RAW) आहे. अफगाणिस्तानातून येणारी गुप्त माहिती गरजेनुसार इतर देशांना दिली जाते. त्याचअंतर्गत माहिती देण्याची विनंती अमेरिकी अधिकाऱ्यांनी केली आहे. भारत सरकार आणि अधिकारी याबाबत योग्य तो निर्णय घेतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Ajit doval, Taliban, USA