तालिबानी कट्टरवाद्यांना (Taliban) साथ देणाऱ्या आणि त्यांना रसद पुरवणाऱ्या पाकिस्तानविरोधात अफगाणी नागरिकांनी आंदोलन केलं. तालिबानी अंमलातल्या अन्यायी नियमांमुळे चिडलेल्या महिलाही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. रात्रीच्या वेळी झालेल्या या आंदोलनाच्या video मध्ये नागरिक पाकिस्तान विरोधी घोषणा देताना स्पष्ट ऐकू येत आहे. पंजशीरचा पाडाव झाल्यानंतर आता अफगाणिस्तानवर तालिबानी सत्तेचा अंमल पक्का झाला आहे. पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सने दावा केल्याप्रमाणे आणि अहमद मसूद या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी वायुसेना त्यांच्यावर सतत हल्ले करत आहे. जगाची झोप उडवणाऱ्या तालिबानचे 6 नवे मित्र, ‘या’ देशांना करणार आनंदात सहभागी पाकिस्तान, ISI तालिबान्यांच्या बरोबरीने लढाईत उतरले आहेत. त्यामुळे आता अफगाणी नागरिकांमध्ये पाकविरोधात असंतोष वाढला आहे. पाकिस्तानमुळेच तालिबानी सत्ता अफगाणिस्तानमध्ये आली. आता काबुलपासून अमेरिकेपर्यंत सगळीकडे पाकिस्तानविरोधात आंदोलन होत आहे AFP च्या वृत्तानुसार काबुलमध्ये मंगळवारी पाकिस्तानविरोधी आंदोलनादरम्यान गोळीबार झाला. यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलं जखमी झाल्याचं या न्यूज एजन्सीने म्हटलं आहे.Night-time protests are taking place in Kabul. Afghan women have had it enough and they're bravely challenging Taliban and Pakistan. "Down with Pakistan" chants are heard in these protests.
This is the cry of a nation against oppression of Taliban and invasion of Pakistan pic.twitter.com/JJrxIYmHCA — Masih Alinejad 🏳️ (@AlinejadMasih) September 6, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.