कृष्ण बाली, प्रतिनिधी अंबाला, 13 जुलै : चंदीगड, पंजाब, हरियाणासह आजूबाजूच्या भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. हवामानशास्त्र विभागाने येथे रेड अलर्ट जारी केला असून शाळांना सुट्टी आणि कार्यालयांना वर्क फ्रॉम होम देण्यात आला आहे. अशातच येथील विविध भागांमध्ये पाणी तुंबल्याचे अतिशय धोकादायक फोटो समोर येत आहेत. हरियाणात तर चक्क कपड्यांचं अख्खं मार्केट पावसाच्या पाण्यात बुडालंय. अंबाला भागातील हे मार्केट आशियातील कपड्यांचं सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. पावसाचं पाणी येथील दुकानांमध्ये शिरलं आणि दुकानांमधील ब्रँडेड कपडे अक्षरश: पाण्यात पोहताना दिसले. हे दृश्य पाहून दुकानदार रडकुंडीला आले. त्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. दुकानदारांनी जमेल तितके पडले वाचवण्याचा प्रयत्न केला.
मार्केटमधील दुकानदारांनी याबाबत संताप व्यक्त केला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज आमचं कोट्यवधींचं नुकसान झालंय, असा आरोप त्यांनी लावला. एका दुकानदाराने सांगितलं, ‘पावसाळ्यात पाणी साचण्याची घटना घडू नये यासाठी आम्ही नालेसफाईसाठी महानगरपालिकेकडे वारंवार मागणी केली होती. मात्र महानगरपालिकेने हे काम उशिराने सुरू केलं. आता पावसाळा सुरू झाला पाणी साचायला लागलं तरी नालेसफाईचं काम पूर्ण झालेलं नाही. परिणामी आमचं नुकसान झालं. आमच्या दुकानांमध्ये पाणी शिरलं, संपूर्ण मार्केट पाण्यात बुडालं.’ क्या बात है! चहा प्या आणि कपही खा; पठ्ठ्याने शोधली फक्कड आयडिया दरम्यान, अंबाला आणि आजूबाजूच्या परिसरातील नदी-नाले सध्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागले आहेत. पूरस्थिती निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे प्रशासनाकडून लोकांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.