• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • राफेल विमानांना कबुतरांपासून धोका; IAFनं व्यक्त केली चिंता

राफेल विमानांना कबुतरांपासून धोका; IAFनं व्यक्त केली चिंता

राफेल विमानांच्या सुरक्षेमुळे भारतीय हवाई दलाच्या चिंतेत भर पडली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 07 जुलै : फान्सकडून भारत राफेल विमानांची खरेदी करणार आहे. 36 विमानं टप्प्याटप्प्यानं भारताकडे सोपवली जाणार आहेत. दरम्यान, पहिलं राफेल विमान 2020मध्ये भारताच्या हवाली केलं जाणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांकडून बैठका देखील पार पडताना दिसत आहेत. राफेल विमान भारतीय हवाई दलात सामील झाल्यामुळे आता भारतीय हवाई दलाच्या ताकदीमध्ये देखील भर पडणार आहे. 2020मध्ये भारताला मिळणारं पहिलं राफेल विमान हे अंबाला एअर बेसवर ठेवलं जाणार आहे. पण, आता राफेल विमानाच्या सुरक्षेच्या मुद्यावरून मात्र भारतीय हवाई दलाच्या चिंतेत भर पडली आहे. कारण, अंबाला एअर बेसच्या आजुबाजुला कबुतरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता भारतीय हवाई दलानं अंबाला प्रशासनाकडे तक्रार केली आहे की, लोकांनी कबुतरे पाळू नयेत. शिवाय, पक्षांसाठी घराच्या छपरावर खाणं, पाणी देखील ठेवू नये. भारतीय हवाई दलानं एक व्हिडीओ देखील ट्विट केला असून विमानाचा अपघात टळलेला दिसत आहे. काँग्रेसला धक्का; राहुल गांधींनंतर या बड्या नेत्याचा राजीनामा काय आहे व्हिडीओ भारतीय हवाई दलानं ट्विट केलेला व्हिडीओ 27 जूनचा आहे. लढाऊ जग्वार विमानाला पक्षी धडकला. त्यामुळे मोठा अपघात होता होता टळला. शिवाय, संभावित जीवित हानी देखील टळली. पण, भारतीय हवाई दलाच्या चिंतेत मात्र भऱ पडली आहे. बंगालमध्ये भाजप-तृणमूल पुन्हा आमनेसामने; जय श्रीरामवरून महाभारत
  Published by:ram deshpande
  First published: