काँग्रेसला धक्का; राहुल गांधींनंतर या बड्या नेत्याचा राजीनामा

काँग्रेसला धक्का; राहुल गांधींनंतर या बड्या नेत्याचा राजीनामा

Rahul Gandhiनंतर काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्यानं राजीनामा दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 जुलै : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला पण, त्याला यश आलं नाही. दरम्यान, काँग्रेसमध्ये सुरू असलेलं राजीनामा सत्र काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कारण, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पत्कराव्या लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण, त्यांचा राजीनामा अद्याप देखील स्वीकारला गेलेला नाही. लोकसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण, काँग्रेसला मात्र चांगलं यश मिळालं नाही. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांनी देखील आपले राजीनामे सादर केले आहेत. यापूर्वी 140 राजीनामे हे काँग्रेस कार्यालयात दाखल झालेले आहेत. त्यामुळे काँग्रसपुढे मोठं आव्हान आहे.

या एका नेत्यामुळे टळू शकेल कर्नाटकातील Congress – JDS सरकारवरील संकट

गुनामधून पराभव

मध्य प्रदेशमध्ये भाजपला धुळ चारत काँग्रेसची सत्ता आणण्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. गुना हा शिंदे घराण्याचा गड. पण, या ठिकाणावरून देखील ज्योतिरादित्य शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. 4 वेळा गुनामधून खासदार असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पराभव हा चांगलाच जिव्हारी लागला होता. दरम्यान, गुनामधून यापूर्वी त्यांचे वडील माधवराव शिंदे आणि आजी विजयाराजे शिंदे यांनी देखील विजय मिळवला होता. गुना येथे झालेला पराभव हा राजघराण्याचा पहिलाच पराभव आहे.

VIDEO: नाणेघाटातील अद्भूत निसर्गाचं सौंदर्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 09:25 AM IST

ताज्या बातम्या