मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Amravati Violence: 12 तारखेची घटना घडली नसती तर 13 तारखेची घटना घडलीच नसती - देवेंद्र फडणवीस

Amravati Violence: 12 तारखेची घटना घडली नसती तर 13 तारखेची घटना घडलीच नसती - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो)

देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो)

Devendra Fadnavis is on Amravati tour: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अमरावती दौऱ्यावर आहेत.

  • Published by:  Sunil Desale

अमरावती, 21 नोव्हेंबर : त्रिपुरात घडलेल्या कथित घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध भागात 12 नोव्हेंबर रोजी मोर्चे काढण्यात आले. याच दरम्यान हिंसाचार (Violence) झाला. तर 13 नोव्हेंबर रोजी अमरावतीत भाजपने बंदचे (Amravati bandh by BJP) आवाहन केलं आणि त्या बंदलाही हिंसक वळण (Amravati Violence) लागलं. या संपूर्ण घटनेनंतर आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीचा दौरा करत घटनास्थळावरील नुकसानाची पाहणी करुन नागरिकांशी चर्चा केली. यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत या हिंसाचारावर भाष्य करताना काही प्रस्न उपस्थित केले आहेत.

... तर 13 तारखेची घटना घडलीच नसती

आता मंत्री, पालकमंत्री, सर्वचजण 12 तारखेची घटना डीलिट करुन केवळ 13 तारखेची एकच घटना आहे असे चित्र निर्माण करतायत. ते चित्र चुकीचं आहे. 12 तारखेची घटना डीलिट करता येत नाही. 12 तारखेची घटना घडली नसती तर 13 तारखेची घटना घडलीच नसती. आता सर्व कारवाई सुरू आहे ती 13 तारखेच्या घटनेसंदर्भात सुरू आहे. टार्गेट करुन कारवाई केली जातेय, भाजप नेत्यांना अटक केलं जात आहे. एका घटनेसाठी 4 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एकतर्फी कारवाईला विरोध करणार, लोकांना विणाकारण टार्गेट करणं चुकीचं आहे. मोर्चामागे मोठं षडयंत्र आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वाचा : "Fake News च्या आधारे मोर्चाचं आयोजन कुणी केलं, त्यांची भूमिका काय होती?", फडणवीसांचा सवाल

13 तारखेला जी घटना घडली ती 12 तारखेच्या घटनेची रिअॅक्शन

मोर्चा झाल्यावर परतीच्या वेळी समाजकंटकांनी ज्यावेळी दुकाने टार्गेट केली, लोकांना टार्गेट केलं. याच्या पाठिमागची भूमिका स्पष्ट दिसतेय की, यातून दंगल घडवाची होती म्हणून एका विशिष्ट समाजाची किंवा धर्माची दुकाने आणि व्यापाऱ्यांवर हल्ला केला गेला. त्यातून मोठ्या प्रमाणात अमरावतीची परिस्थिती बिघडली. 13 तारखेला जी घटना घडली ती 12 तारखेच्या घटनेची रिअॅक्शन होती. 13 तारखेला जी हिंसा झाली त्याचं समर्थन मी बिलकूल करणार नाही. कुठल्याच हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या घटनाच घडल्या नाहीत त्याच्या संदर्भात माहिती पसरवण्यात आली. सीपीआयएमचं एक ऑफिस होतं ज्याला आग लागली होती त्याते फोटो होते. दिल्लीतील एका कॅम्पमध्ये लागलेल्या आघीचा व्हिडीओ होता. काही रोहिंग्यांचे फोटो होते तर काही पकिस्तानातील एका शहरातले फोटो होते. अशा फोटोंच्या आधारे देशभरात जाणीवपूर्वक एका समाजाला भडकवण्यात आलं.

वाचा : अमरावती हिंसाचार प्रकरणात मोठी अपडेट, सायबर सेलच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे

आमचं तर स्पष्ट मत आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणातील मोर्चे एकाच दिवशी, राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून निघतात. हे मोर्चे पूर्वनियोजित मोर्चे होते. नांदेड, मालेगाव, अमरावती या ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी हे मोर्चे निघाले. सर्वप्रथम याची चौकशी झाली पाहिजे की, या फेक न्यूजच्या आधारावर हे मोर्चे कुणी प्लॅन केले? त्यांची यामागची भूमिका काय होती? असे सवालही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले.

First published:

Tags: Amravati, BJP, Devendra Fadnavis