मराठी बातम्या /बातम्या /देश /

Amazon India ने केला मोठा पक्षपात, बडे उद्योजक तुपाशी लहान व्यावसायिक मात्र उपाशी

Amazon India ने केला मोठा पक्षपात, बडे उद्योजक तुपाशी लहान व्यावसायिक मात्र उपाशी

Amazon ने आपण सर्व उद्योजकांना समान वागणूक देत असल्याचा दावा करतं. मात्र प्रत्यक्षात वास्तव काही वेगळंच आहे.

Amazon ने आपण सर्व उद्योजकांना समान वागणूक देत असल्याचा दावा करतं. मात्र प्रत्यक्षात वास्तव काही वेगळंच आहे.

Amazon ने आपण सर्व उद्योजकांना समान वागणूक देत असल्याचा दावा करतं. मात्र प्रत्यक्षात वास्तव काही वेगळंच आहे.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : अमेझॉन (Amazon) ही इ-कॉमर्स (e-commarce) क्षेत्रातील बलाढ्य जागतिक कंपनी (global giant). भारतातही अमेझॉननं आपलं बस्तान व्यवस्थित बसवलं आहे. आता मात्र भारतात अमेझॉन लहान उद्योजकांबाबत (small businessmen) कसा पक्षपाती व्यवहार करतं याची खळबळजनक माहिती पुराव्यासह समोर आली आहे. रॉयटर्सनं (Reuters) याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, 2019 च्या सुरवातीला अमेझॉनचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी जय कार्ने (Jay Carney) हे एका महत्त्वाच्या बैठकीची तयारी करत होते. जय कार्ने हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांचे माध्यम सचिव राहिलेले आहेत. जय यांची भारताच्या अमेरिकेतील राजदूतासोबत (India's ambassador to United States) वॉशिंग्टन (Washington) इथं एक बैठक होती. भारतानं एफडीआय (FDI) अर्थात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा नुकताच स्वीकार केला होता. अमेझॉनला आपल्या उद्योगाला यापासून धोका आहे असं वाटत असल्यानं ही बैठक (meeting)करण्यात आली. या बैठकीआधी अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी जय यांच्यासाठी एक नोट तयार केली. यात जय यांनी काय बोलावं आणि काय नाही याबाबत लिहिलेलं होतं. त्यात म्हटलं होतं, की जय यांनी हे सांगावं, की कशा पद्धतीनं अमेझॉन भारतात 550 कोटी डॉलर्सचा व्यवसाय आणण्यासाठी कटिबद्ध आहे. सोबतच अमेझॉननं 4 लाखांहून अधिक भारतीय विक्रेत्यांसाठी (Indian sellers) कशा प्रकारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म (online platform) उभारला आहे. पण जय यांना बजावलं गेलं होतं, की त्यांनी एक तथ्य अजिबात उघड करू नये. ते म्हणजे अमेझॉनच्या वेबसाईटवर  (Amazon India Website) विकल्या गेलेल्या एकूण मालांपैकी एक तृतीयांश माल हा केवळ 33 कंपन्यांनी विकलेला आहे. ही माहिती या नोटमध्ये 'संवेदनशील/उघड करण्यासाठी नाही' या शीर्षकाखाली दिलेली होती. यासोबतच इतरही काही वादग्रस्त माहिती या रॉयटर्सला सापडलेल्या कागदपत्रांमध्ये आहे. अमेझॉनच्या भारतातील वेबसाईटवर दोन बलाढ्य कंपन्या अशा आहेत, ज्यांच्यात अमेझॉनचे इनडायरेक्ट इक्विटी शेअर्स आहेत. या दोन कंपन्यांनी मिळून अमेझॉनला 2019 मध्ये 35 टक्के विक्री महसूल (Sales revenue) मिळवून दिला. हेही वाचा आत्मनिर्भर भारतच्या दिशेने आणखी एक पाऊल,आता भारतातच तयार होणार Amazon फायर स्टिक ही सगळी माहिती राजकीयदृष्ट्या संवेदनशील (politically sensitive) होती. ती उघड झाली असती तर मोठ्या वादाला तोंड फुटलं असतं. कारण आधीच भारतातील लहान उद्योजक आक्षेप घेत आले आहेत, की अमेझॉन खूप जाचक अटी आणि निर्बंध लादत त्यांच्या व्यवसायाला नुकसान पोचवत असतं आणि मोठ्या ब्रँड्सना अमेझॉन विशेष वागणूकही देतं. सोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही ही बाब खटकली असती. कारण त्यांनी आपली राजकीय बांधणी याच सगळ्या लहान व्यावसायिकांच्या जोरावर केली आहे. अमेझॉन भारतात सतत आपला सार्वजनिक चेहरा असा सादर करत आलं आहे, की आम्ही लहान उद्योजकांना सतत प्रोत्साहन देतो आणि त्यांना मोठं करणं हा आमचा हेतू आहे. मात्र यातून अमेझॉनचं पितळ उघड झालं असतं. एका मार्केटिंग स्लोगनमध्ये अमेझॉन असंही म्हणतं, 'ट्रान्सफॉर्मिंग लाईव्ह्ज, वन क्लिक ऍट अ टाइम' आजवर अनेकदा अमेझॉननं आपण सगळ्या व्यावसायिकांना सामान वागणूक आणि मंच देत असल्याचाही दावा केलेला आहे. 2019 च्या एप्रिलमध्ये ही बैठक झाली. मात्र जय यांनी भारतीय राजदूतांना काय सांगितलं हे पुरेसं स्पष्ट नाही. विशेष म्हणजे भारतात सध्या एडीद्वारे अमेझॉनची चौकशीही सुरू आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या नियमांचं कथित उल्लंघन केल्याचा आरोप अमेझॉनवर आहे.
First published:

Tags: Amazon, India, Narendra modi, President barak Obama

पुढील बातम्या