पाकिस्तानचा खोटेपणा उघड : Airstrike संदर्भात लपवलेल्या सत्याचे पुरावे आले समोर!

पाकिस्तानचा खोटेपणा उघड : Airstrike संदर्भात लपवलेल्या सत्याचे पुरावे आले समोर!

Airstrike नंतर पाकिस्तान जगासमोर किती धादांत खोटं बोलत होता हे या फोटोंतून उघड होईल. भारताने परतवून लावलेल्या हल्ल्यांत आमचे सैनिक मारले गेले नाहीत, असं म्हणणाऱ्या पाकिस्तानने त्याच सैनिकांचं स्मारक स्वतःच्या देशात बांधलं आहे.

  • Share this:

संदीप बोल

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : पाकिस्तान जगासमोर किती धादांत खोटं बोलत होता हे या फोटोंतून उघड होईल. भारताच्या Air Strike नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने 27 फेब्रुवारीला भारतावर हल्ला करण्याच्या उद्देशाने F16 लढाऊ विमानांचा वापर करत अॅमरॅम मिसाईलचा वापर केला होता. भारताच्या हवाईदलाने IAF दक्ष राहून हा हल्ला परतवून लावला. या हल्ल्यात पाकिस्तानची दोन विमानं भारताने पाडली. पण हे सत्य पाकिस्तान नाकारत होतं. पाकिस्तानचे सैन्याधिकारी पत्रकार परिषद घेऊन जगाला ओरडून सांगत होते की, मारले गेलेले वैमानिक आमचे नाहीतच. पण आता त्याच सैनिकांचं स्मारक पाकिस्तानात उभारलं गेलं आहे. हे या स्मारकांच्या फोटोंतून उघड होईल.

पाकिस्तानात या दोन सैनिकांचं स्मारक उभारलं आहे.  या स्मारकावर वैमानिकांची नावं नाहीत. पण अॅमरॅम मिसाईलने भारताच्या सुखोई विमानांना पाडलं असा उल्लेख मात्र केला आहे. हीच गोष्ट पाकिस्तान दुनियेसमोर नाकारत होता. अॅमरॅम मिसाईल F- 16 या लढाऊ विमानांतूनच डागलं जाऊ शकतं. ही विमानं पाकिस्तानला अमेरिकेने दिली आहेत. भारताविरोधात ही लढाऊ विमानं वापरण्यापूर्वी पाकिस्तानने अमेरिकेला याची कल्पना दिली नाही, म्हणून अमेरिकेने सवाल केले होते. त्यावर आम्ही ही विमानं वापरलीच नाहीत, असं धादांत खोटं पाकिस्तानच्या वतीने सांगण्यात आलं. आता या स्मारकांमधून सत्य बाहेर आलं आहे.

पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावत असतानाच भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यातील भागात पडले आणि पाकिस्तानच्या हाती लागले. भारत आणि पाकिस्तानातल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदलाने 28 फेब्रुवारीला संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती.  पाकिस्तानचा लष्करी तळांवर हल्ला करण्याचाच इरादा होता, हे सिद्ध करणारे पुरावे या पत्रकार परिषदेनंतर दाखवण्यात आले होते. पण पाकिस्तानने ते तेव्हा कबूल करण्यास नकार दिला होता.

अॅमराम मिसाईल्स वापरल्याचे पुरावे या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. ही मिसाईल्स भारताच्या लष्करी आस्थापनांविरोधातच वापरण्याचा पाकिस्तानचा इरादा होता. पण भारतीय सैन्यदलांच्या दक्षतेमुळे त्यांचे प्रयत्न हाणून पाडले गेले, असं भारतीय सैन्यदलांच्या प्रतिनिधींनी सांगितलं होतं. तेच आता या फोटोंमधून सिद्ध झालं आहे.

28 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत भारताने काय दाखवलं?

एअर व्हाईस चीफ मार्शल आर. जी. के. कपूर यांनी यासंदर्भात विचारलेल्या माहितीवर सांगितलं की, पाकिस्तानने आमच्या आस्थापनांवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती, याचे पुरावे आहेत. F16 हे विमान एअर टू एअर मिसाईल्ससाठीच वापरलं जातं. या लढाऊ विमानाचे तुकडे भारताच्या हद्दीत पूर्व राजौरीजवळ सापडले आहेत. याचा अर्थ उघड आहे. पाकिस्तानी हवाई दल मोठं लक्ष्य घेऊन भारतीय हद्दीत आलेलं होतं, असं ते म्हणाले.

पाकचे सैनिक घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळाले, पाहा VIDEO

"पाकिस्तानने वेळोवेळी आपलं निवेदन बदललं. सुरुवातीला त्यांनी 2 भारतीय विमानं पाडल्याचं सांगत 2 वैमानिक ताब्यात असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर संध्याकाळी निवेदन फिरवून एकच पायलट ताब्यात असल्याचं सांगितलं", असं एअर व्हाइस मार्शल कपूर म्हणाले.

"भारताने 26 फेब्रुवारीला पहाटे ठरवलेलं लक्ष्य साधलं आणि मोहीम फत्ते केली. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. पण ते कधी आणि कसे सादर करायचे याचा निर्णय भारत सरकारमधली उच्चपदस्थांचा आहे", असंही कपूर म्हणाले.

भारतानं मारले पाकचे सैनिक, मृतदेह नेण्यासाठी केली धावाधाव; पाहा VIDEO

पाकिस्तानने त्यांच्या ताफ्यातलं F16 लढाऊ विमान भारताविरोधात वापरलं याचे पुरावे दर्शवताना एअरफोर्सचे अधिकारी म्हणाले, "एअर टू एअर मिसाईल वाहून नेण्यासाठीचं हे एकच एअरक्राफ्ट आहे. प्रत्येक लढाऊ विमान हद्दीत प्रवेश करतं तेव्हा त्यांना ओळखायची यंत्रणा आमच्याकडे असते. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असलेले पुरावे आमच्याकडे आहेत. या पुराव्यांमधून पाकिस्तानी सैन्याचा उद्देश स्पष्ट होता.

-----------------------------------

श्रीनगरमध्ये तिरंगा फडकला, बारामतीतलं मुख्यमंत्र्यांचं UNCUT भाषण

First published: September 17, 2019, 5:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading