भारतानं मारले पाकचे सैनिक, मृतदेह नेण्यासाठी केली धावाधाव; पाहा VIDEO

भारतानं मारले पाकचे सैनिक, मृतदेह नेण्यासाठी केली धावाधाव; पाहा VIDEO

घुसखोरांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी पाकच्या सैनिकांनी गुडघे टेकत पांढरा झेंडा दाखवला. मात्र, भारतानं त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.

  • Share this:

श्रीनगर, 14 सप्टेंबर : जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना भारतीय सैनिकांनी कंठस्नान घातलं होतं. यानंतर पाकचे सैनिक या घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळून गेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पाकिस्तानी सैनिक पांढरा झेंडा दाखवून घुसखोरांचे मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, त्यांचे हे प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडले.

काश्मीरमधील हाजीपूर सेक्टरमधील हा व्हिडिओ 10 ते 11 सप्टेंबरदरम्यानचा असल्याचं म्हटलं जात आहे. यात पाकिस्तानी सैनिका पांढरा झेंडा दाखवताना दिसत आहेत. त्यात सैनिक खांद्यावर मृतदेह घेऊन जाताना दिसतात.

मृतांमध्ये पाकिस्तानी सैनिक गुलाम रसून याचा समावेश आहे. तो पंजाब प्रांतातील बहावलनगर इथला आहे. याआधी पाकिस्तानी सैनिकांनी एका पंजाबी मुस्लीम सैनिकाचा मृतदेह नेण्यासाठी गोळीबार केला होता. तेव्हा त्यांचा आणखी एक सैनिक मारला गेला. त्यांनी पुन्हा सैनिकांचे मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तरी भारतीय सैनिकांनी प्रयत्न हाणून पाडले.

सैनिकांचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी पाकिस्तानने पांढरा झेंडा दाखवला. त्याआधी केरन सेक्टरमध्ये 5 ते 7 सैनिक आणि दहशतवादी मारले होते. त्यांचे मृतदेह परत नेण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. ते पंजाब प्रांतातील पाकिस्तानी सैनिक नव्हते. पाकिस्तानी सैन्यात पंजाबी मुस्लीमांचे वर्चस्व असून इतरांना त्यांच्या तुलनेत कमी लेखलं जातं.

पाकचे सैनिक घुसखोरांचे मृतदेह घेऊन पळाले, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 01:48 PM IST

ताज्या बातम्या