मराठी बातम्या /बातम्या /देश /

Coal : भारतासाठी 'कोळसा' अवघड जागेचं दुखणं! सांगताही येईना अन् दाखवताही येईना

Coal : भारतासाठी 'कोळसा' अवघड जागेचं दुखणं! सांगताही येईना अन् दाखवताही येईना

coal

coal

  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : हवामान बदल (Climate Change) हे जगासमोरील सर्वात मोठं संकट आहे. ग्लासगो इथं झालेल्या हवामान बदलाविषयक COP26 या परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली. 2070 सालापर्यंत नेट झिरो (Net Zero) म्हणजे शून्य कार्बनचे (Zero Carbon Emmission) लक्ष्य गाठणार असं भारताकडून जाहीर करण्यात आलं. म्हणजे 2070 सालापर्यंत भारत कार्बन न्यूट्रल देश बनणार आहे. भारताची ही भूमिका जगासाठी अत्यंत महत्वाची आहे, त्याचं अनेकांनी स्वागत केलं आहे. मात्र, ही परिस्थिती सत्यात उतरवणं किती मोठं दिव्य आहे. याची प्रचिती आपल्याला देशातील उर्जास्त्रोतांच्या वापरावरुन लक्षात येईल.

हवामानातील बदल थांबवण्यासाठी जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व लवकरात लवकर कमी करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात मोठे आव्हान आहे ते कोळशाचा (Coal) वापर, जो अजूनही चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये वीजनिर्मितीसाठी मुख्य इंधन आहे. भारत (India) हा जगातील तिसरा सर्वात मोठा जीवाश्म इंधन उत्सर्जित करणारा देश आहे आणि कोळशावर खूप अवलंबून आहे. ग्लासगो (Glasgow) क्लायमेट कॉन्फरन्सनंतर जिथे जगातील देशांवर जीवाश्म इंधनापासून मुक्त होण्यासाठी दबाव वाढत आहे, तिथे भारताचे कोळशावरील अवलंबित्व संपवणे हे मोठे आव्हान आहे.

जीवाश्म इंधनावर पश्चिम आणि विकसनशील देश Western and developing countries on fossil fuels

भारतासारख्या विकसनशील देशांवरील जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व दूर करणे सोपे नाही. शेकडो वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांती झाल्यापासून पाश्चिमात्य देशांनी जीवाश्म इंधनाचा अतिवापर करून जग प्रदूषित केले आहे आणि ते कमी करण्याचा विचार केला तर त्याची जबाबदारी ते विकसनशील देशांवर लादत असल्याचा आरोप हे देश करतात.

भारतात कोळशाचा वापर पूर्ण थांबेल? जाणून घ्या काय असेल भविष्यातील स्थिती

भारताचे अवलंबित्व India's dependence

पाश्चिमात्य देश भारताला कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सांगत आहेत. अशा स्थितीत कोळशाचा वापर कमी करण्यावर भर दिला जात आहे. कोळसा हा जीवाश्म इंधनाचा सर्वात वाईट प्रकार आहे. परंतु, भारताच्या ऊर्जा उत्पादनात त्याचा वाटा 70 टक्के आहे. एवढेच नव्हे तर भारतातील पायाभूत सुविधाही नजीकच्या भविष्यात दुसऱ्या स्त्रोताकडे जाण्यास अजिबात तयार नाही.

भारतातील कोळसा उद्योग Coal industry in India

ब्रुकिंग्स संस्थेच्या अलीकडील अहवालानुसार, भारतातील कोळसा उद्योगात सुमारे 4 दशलक्ष लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत. यापैकी बहुतेक कोळसा खाणी पूर्वेला आहेत, ज्यांना कोळसा पट्टा म्हणतात, ज्या झारखंड, छत्तीसगड किंवा ओडिशामध्ये आहेत. या भागात कोळशाचा अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे आणि हाच कोळसा काही स्थानिक समुदायांची जीवनरेखा देखील आहे.

Air Pollution In India : हवा प्रदूषणाचा भारतीयांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम; इतकं आयुष्य घटण्याची भीती

अनेकांसाठी जीवनरेखा Lifeline for many

ओडिशाच्या खाणींमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे केंद्रीय नेते सुदर्शन मोहंती यांनी सांगितले की भारत कोळशाशिवाय जगू शकत नाही. कोळशापासून स्वच्छ ऊर्जा स्त्रोतांकडे जाण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे. कोळशावर अवलंबून असलेले लोक या बदलात मागे राहू नयेत, हे यातील सर्वात महत्त्वाचे काम असेल.

तर मोठे संकट येईल

आंतरराष्ट्रीय दबावाखाली कोळसा उत्पादन बंद केले तरी भारतातील अनेक लोक बेघर होतील. हजारो कुटुंबांवर आर्थिक संकट येणार आहे. अनेक दशकांपासून खाणींमध्ये काम करून हे लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. मोहंती सांगतात की, झाडे लावून काही भरपाई केली तरी कोळसा उत्पादन थांबवण्याचा करार होणे शक्य नाही.

कोळशाचा वापर वाढतोय Coal consumption is increasing

भारतात ऊर्जेची मागणी वाढत आहे. गेल्या दशकात कोळशाचा वापर दुपटीने वाढला आहे. भारताला अजूनही मोठ्या प्रमाणात कोळसा आयात करावा लागतो आणि येत्या काही वर्षांत अनेक खाणींमध्ये खाणकाम सुरू करण्याची योजना आहे. तरीही सरासरी भारतीय अमेरिकन किंवा ब्रिटिश नागरिकांपेक्षा खूपच कमी वीज वापरतो.

First published:

Tags: Climate change, Environment, Modi government, Pollution