जाहिरात
मराठी बातम्या / देश / Air Pollution In India : हवा प्रदूषणाचा भारतीयांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम; इतकं आयुष्य घटण्याची भीती

Air Pollution In India : हवा प्रदूषणाचा भारतीयांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम; इतकं आयुष्य घटण्याची भीती

Air Pollution In India : हवा प्रदूषणाचा भारतीयांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम; इतकं आयुष्य घटण्याची भीती

एका अमेरिकन रिसर्च ग्रुपच्या अलीकडील अहवालातून भारतातील हवा प्रदूषणाविषयी (Air Pollution in India) गंभीर बाब समोर आली आहे. हवा प्रदूषणामुळं 40 टक्के भारतीयांचे आयुर्मान 9 वर्षांपर्यंत कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : जगातील वाढत्या हवा प्रदूषणामुळे (Air Pollution) लोकांचे आयुष्य दिवसेंदिवस कमी होत आहे. औद्योगिकरण, तंत्रज्ञान, वाहने इत्यादींच्या बेसुमार वापरामुळं हवेचा पोत घसरत चालला आहे. एकीकडे विकासाच्या नावाखाली चालवले जाणार प्रकल्प दुसरीकडं लोकांच्या जीवावर बेतत आहेत. एका अमेरिकन रिसर्च ग्रुपच्या अलीकडील अहवालातून भारतातील हवा प्रदूषणाविषयी (Air Pollution in India) गंभीर बाब समोर आली आहे. हवा प्रदूषणामुळं 40 टक्के भारतीयांचे आयुर्मान 9 वर्षांपर्यंत कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट (EPIC) ने तयार केलेल्या अहवालानुसार, मध्य, पूर्व आणि उत्तर भारताच्या पट्ट्यात राहणाऱ्या सुमारे 48 कोटी लोकांना वायू प्रदूषणाच्या उच्च पातळीचा सामना करावा लागत आहे. एपिकच्या अहवालात म्हटले आहे की, वायू प्रदूषणाची उच्च पातळी भौगोलिकदृष्ट्या कालांतराने वाढतच चालली आहे.  मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता खूप वेगाने खालावली आहे. हे वाचा -  सासरे अन् मेहुणीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या; 4 पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा धोकादायक प्रदूषणाच्या पातळीला आळा घालण्यासाठी 2019 मध्ये भारतात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) सुरू करण्यात आला आहे. याची या अहवालात दखल घेण्यात आली असून या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले आहे. NCAP लक्ष्य साध्य करणे आणि ते कायम राखणे यामुळे देशाचे एकूण आयुर्मान 1.7 वर्षे आणि नवी दिल्लीचे 3.1 वर्षे वाढेल, असे सांगण्यात आले आहे. हवा प्रदूषण रोखण्यासाठी NCAP ने 2024 पर्यंत 102 सर्वात जास्त प्रभावित शहरांमध्ये 20 ते 30 टक्के प्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वाहतूक इंधन आणि बायोमास (सेंद्रिय घटक,कचरा) जाळण्यासाठी कठोर नियम लागू करून आणि औद्योगिक उत्सर्जन आणि वाहनांच्या एक्झॉस्टमध्ये घट निश्चित केली आहे. हे वाचा -  BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 198 जागांसाठी बंपर भरती; आजच करा अप्लाय गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनमुळं दिल्लीच्या 20 कोटी लोकांना उन्हाळ्यात स्वच्छ हवेचा श्वास घेता आला होता. पंजाब आणि हरियाणामध्ये शेतीतील पालापाचोळा जाळल्यामुळे दिल्लीतील लोकांना हिवाळ्यात दूषित हवेचा सामना करावा लागला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात