नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : देशाची राजधानी दिल्लीसह (Delhi) इतर राज्यांतील शाळा (Schools Reopening) सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टींची काळजी (Care) घेण्याचा सल्ला ‘एम्स’च्या (AIIMS) डॉक्टरांनी दिला आहे. 1 सप्टेंबरपासून राजधानी दिल्लीसह देशातल्या अन्य राज्यांमध्ये शाळा सुरु होत आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाळा अगोदरच सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर काळजी घेणे आणि सतर्कता बाळगणे गरजेचं असल्याचं मसल्यत एम्सच्या औषध विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नवनीत विग यांनी म्हटलं आहे. कोरोनाची लागण होण्याची भीती देशात लसीकरण मोहिमेनं वेग घेतला असला, तरी शालेय विद्यार्थ्यांसाठी लस अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे लसीकरण न होता बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीइतकीच काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहणे, शाळांचे सॅनिटायझेशन, घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्याचे आणि परत घरी येण्यासाठी वाहनाचे नियोजन, स्वच्छतागृहांचे नियोजन यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत डॉ. विग यांनी व्यक्त केलं आहे. विद्यार्थ्यांना शाळेतच सर्वाधिक धोका कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून घरी बसावे लागले असल्यामुळे शाळा सुरु होणे ही विद्यार्थी आणि पालकांची मानसिक गरज तर आहेच. मात्र आजही विद्यार्थ्यांना कोरोना होण्याचा सर्वाधिक धोका हा शाळेतच असल्याचं डॉ. विग म्हणतात. त्यातच सणांचा काळ सुरू होत असल्यामुळे रस्त्यावरील गर्दीदेखील वाढणार आहे. कोरोनाचा विषाणू विद्यार्थ्यांच्या शरीरात प्रवेश करण्याच्या अनेक शक्यता यामुळे निर्माण होणार आहेत. विद्यार्थी घरी न राहता ते दररोज बाहेर पडणं, हे मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे. हे वाचा - भुताने झपाटल्याचं सांगून मांत्रिक शिरला घरात; मुलीला पाहून कुटुंबीय हादरलं कोरोना रुग्णांच्या दराकडे लक्ष कोरोनाचा दर हा 0.5 टक्क्यांच्या वर जाणार नाही, याची खबरदारी बाळगणं गरजेचं असल्याचं डॉ. विग यांनी म्हटलं आहे. यापेक्षा अधिक दर असणाऱ्या परिसरात शाळा सुरु करणं धोक्याचं असून त्या ठिकाणी शासनाने शाळा सुरु करण्याची परवानगी देताना पुनर्विचार करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.