ताजमहालाचं सौंदर्य धोक्यात, शुभ्र पांढऱ्या रंगांची वास्तू होतेय हिरवी

ताजमहालाचं सौंदर्य धोक्यात, शुभ्र पांढऱ्या रंगांची वास्तू होतेय हिरवी

Taj Mahal turning Green: पुरातन काळातील ऐतिहासिक वास्तू म्हणजे देशाचं वैभव. ताजमहाल त्यापैकीच एक आहे.

  • Share this:

आग्रा, 28 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशात आग्रा इथं असलेला ताजमहाल (Uttar Pradesh Agra Tajmahal) जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. (Taj Mahal one of the seven wonders) जगभरातून लोकं या अद्भुत वास्तूला भेट देण्यास येतात. ताजमहालास प्रेमाचं  प्रतीक मानलं जातं.

सध्या या सुरेख वस्तूवर एक संकट घिरट्या घालतं आहे. हे संकट आणलं आहे एका किड्यानं. ताजमहल यमुना नदीच्या किनाऱ्यावर उभा आहे. या यमुना नदीच्या पात्रात काही किडे जन्मतात आणि वाढतात. (Taj Mahal beauty in danger)

हे किडे ताजमहालाचं सौंदर्य बिघडवण्याचा धोका उभा राहिला आहे. कारण हे किडे शुभ्र पांढऱ्या रंगाच्या ताजमहालाला हिरवा करतात. ताजमहालाच्या ज्या भिंतीवर हे किडे उडत जाऊन चिटकतात तिथला रंग बदलून हिरवा होतो. (insects damaging Taj Mahal marble)

शुभ्रधवल सुरेख ताजमहाल या किड्यांमुळे हिरवा होतो आहे. या किड्यांचं नाव आहे गोल्डी काइरो नोमस. हा किडा अत्यंत सूक्ष्म असतो. हा किडा सहजासहजी उघड्या डोळ्यांना दिसतही नाही. या किड्यांना ताजमहालाच्या भिंतींवरून हटवण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची शाखा हरप्रकारे प्रयत्न करते आहे. (Goldy kaioro nomas insects damage Taj Mahal)

हेही वाचा सोशल मीडियाबाबत नियम घालणारा भारत नाही पहिला देश; वाचा जगभरातले कायदे

ताजमहालाच्या भिंती पाण्यानं धुतल्या जात आहेत. भिंती काळजीपूर्वक पुसल्या जात आहेत. साफ केल्या जात आहेत, जेणेकरून या गोल्डी काइरो किड्यानं ताजमहालाच्या सौंदर्याला बाधा आणू नये. (Tajmahal walls are being washed with water)

हेही वाचा खेळणी उद्योगात दडलेली ताकद ओळखून ती वाढवणं आवश्यक : पंतप्रधान मोदी

या किड्याबाबत भारतीय पुरातत्व संशोधन विभागानं अभ्यासही केला आहे. याबाबत माहिती देताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षण रसायनज्ञ असलेल्या एम. के. भटनागर यांनी सांगितलं, की ताजमहालाच्या भिंतींवर जिथं कुठं धोका जाणवला तिथं भिंतींची पाण्यानं चांगली साफसफाई केली जाते आहे. एकदा त्यांचा मोसम संपला की हे किडे आपोआप उडून जातील.

Published by: News18 Desk
First published: February 28, 2021, 2:20 PM IST

ताज्या बातम्या