मोदी सरकारच्या विरोधात 8 खासदार करणार संसदेच्या आवारातच मुक्काम!

मोदी सरकारच्या विरोधात 8 खासदार करणार संसदेच्या आवारातच मुक्काम!

राज्यसभेत त्या दिवशी मार्शल नसते तर सभापतींनाच धक्काबुक्की झाली असती असं मत सोमवारी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 21 सप्टेंबर: कृषी विधेयकाच्या चर्चेच्या वेळी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला होता. त्या गदारोळाला जबाबदार असल्याच्या कारणावरून विविध पक्षांच्या 8 खासदारांना काही दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्या विरोधात हे खासदार संसदेच्या आवारातच निलंबनाला बसले आहेत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या खासदारांनी सकाळपासूनच ठिय्या ठोकला असून रात्री तिथेच मुक्काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

डेरेक ओब्रायन, दोला सेन (तृणमूल), राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन (काँग्रेस), संजय सिंह (आप), के.के. रागेश, इल्लामारम करीम (CPI-M) या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई म्हणजे मुस्कटदाबी असल्याची टीका या खासदारांनी केली आहे. सरकार आवज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही या खासदारांनी केला आहे.

BIG NEWS: रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ, मोदी सरकारचा मोठा निर्णय

राज्यसभेत त्या दिवशी मार्शल नसते तर सभापतींनाच धक्काबुक्की झाली असती असं मत सोमवारी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं होतं.

काय होतोय विधेयकाला विरोध?

या विधेयकाला देशभरातून मोठा विरोध होण्याचं मुख्य कारण म्हणजे, हा नवीन कायदा लागू झाल्यास कृषी क्षेत्र भांडवलदारांच्या हातात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार, हमीभावाती पद्धत देखील संपुष्टात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नसल्याची भीती देखील  व्यक्त केली जात आहे.

पहिल्यांच समोर आलं भारतात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमागचं कारण

त्याचबरोबर कमिशन एजंटचं कमिशन बुडणार असल्याची भीती एजंटांनी व्यक्त केली आहे. पंजाबमध्ये जवळपास 12 लाख शेतकरी कुटुंब असून सर्वांनाच याचा फटका बसणार आहे. नव्या कृषी विधेयकाविरोधात प्रामुख्याने तीन राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्यात पंजाबचा समावेश आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 21, 2020, 9:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading