Coronavirus : ...म्हणून भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत कोविडचे रुग्ण; पहिल्यांदाच समोर आलं कारण

Coronavirus : ...म्हणून भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत कोविडचे रुग्ण; पहिल्यांदाच समोर आलं कारण

हैदराबादच्या CCMB च्या संशोधकांनी भारतात प्रचंड वेगाने कोरोना विषाणू (Covid-19) पसरत असल्याचं कारण पहिल्यांदाच जाहीर केलं आहे.

  • Share this:

संजय तिवारी

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : भारतात सध्या Coronavirus ने थैमान घातलं असून, वेगाने रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे भारताढचं संकट वाढत आहे. जगभरात आता अमेरिकेखालोखाल भारतातली रुग्णसंख्या आहे. आपल्याकडे कडक Lockdown काळात सुरुवातीला कोरोना आटोक्यात होता. मात्र लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आले. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या भारतातील रुग्णांची संख्या 1 लाखांपर्यंत पोहोचत असून, यामध्ये भर पडताना दिसून येत आहे. भारतात इतक्या वेगाने कोरोना कसा काय पसरत आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यामागील एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजीच्या (centre for cellular and molecular biology, Hyderabad) संशोधनात समोर आले आहे की, भारतात कोरोनाच्या A2a या स्ट्रेनने मोठ्या प्रमाणात रुग्ण संक्रमित केले आहेत.

देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी (Covid-19 patients) 70 टक्के रुग्ण हे A2a स्ट्रेनमुळे संक्रमित झाले आहेत. त्यामुळे भारतात दररोज इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. जगभरात देखील A2a स्ट्रेनमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोना संक्रमित होत आहेत. सुरुवातीला भारतात A3i स्ट्रेनमुळे कोरोना संक्रमित रुग्णांचं प्रमाण 41 टक्के होतं पण ते नंतर कमी होत गेलं. मात्र आता रुग्ण A2a स्ट्रेनने कोरोना संक्रमित होत असल्यामुळं संख्या वाढताना दिसून येत आहे. जगभरात देखील याच प्रकारच्या कोरोना व्हायरसवर लस तयार करण्याचे काम सुरु आहे.

भारतात A2a कोरोनाने संक्रमित रुग्ण अधिक

हैदराबादच्या CCMB चे संचालक डॉ. राकेश कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारताबरोबरच जगभरात देखील A2a स्ट्रेनने कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. भारतात सध्या लशीच्या चाचण्या सुरु आहेत.भारतात A3i स्ट्रेनचे रुग्ण अधिक होते त्यामुले A2a वर येणारी लस किती उपयोगी ठरेल ही शंका आधी शास्रज्ञांना वाटत होती पण आता A2a स्ट्रेनमुळेच कोरोना संसर्ग होत आहे त्यामुळे ती लस भारतातील रुग्णाला लागू पडेल.

दरम्यान, भारतात सध्या ज्या प्रकारच्या लसींची चाचणी सुरु असून ती A3i या व्हायरसवर प्रभावी आहे. मात्र सध्या A2a या प्रकारच्या कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात असल्याने ती लस यावर प्रभावी ठरणार कि नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 21, 2020, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading