BIG NEWS: रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ, कृषी विधेयकाला विरोध होत असतानाच केंद्राचा निर्णय

BIG NEWS: रब्बी पिकांच्या MSPमध्ये वाढ, कृषी विधेयकाला विरोध होत असतानाच केंद्राचा निर्णय

कृषी मुल्य आयोगाने (Commission for Agricultural Costs and Prices) केलेल्या शिफारशींनुसार मोदी सरकार (Modi Government) ने हा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 21 सप्टेंबर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला देशभर विरोध होत असतांनाच केंद्रातल्या मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली. मुख्य 6 पिकांमध्ये ही वाढ आहे.  गव्हाची MSP 50 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता ती 1,975 रुपये एवढी झाली आहे.

गहू, चना, हरबरा, करडई यासह 6 पिकांच्या किंमतींमध्ये ही वाढ होणार आहे. 50 ते 300 रुपयांची ही वाढ आहे. कृषी विधेयकांवर वाद सुरू असतांनाच केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

कृषी मुल्य आयोगाने (Commission for Agricultural Costs and Prices) केलेल्या शिफारशींनुसार मोदी सरकार (Modi Government) ने हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

नव्या विधेयकांनुसार आता यापुढे सरकार अशा किंमती वाढवणार नाही असा आरोप विरोधकांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना संदेश देण्याचे काम केंद्राने केले आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कृषीमूल्य आयोगाची गव्हाच्या किमतीत वढ करण्याची शिफारस     केली आहे. गव्हाची हमीभावात वाढ करण्याचा मोठा निर्णय़ होऊ शकतो. उत्तर भारतात शेतकरी विधेयकाला असलेल्या निर्णयाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय होण्याची चिन्ह आहे.

बँकिंग सेक्टरमध्ये मोठ्या बदलाची गरज; रघुराम राजन, विरल आचार्यांनी सुचवले पर्याय

गव्हाला 85 रुपये प्रति क्विंटल भाव वाढीची शिफारस करण्यात आली आहे. गव्हाला एमएसपी 2019 - 20 मध्ये 1840 रुपये प्रति क्विंटल भाव होता. तो वाढवून 1925 रुपये प्रति क्विंटल करावा अशी शिफारस करण्यात आली आहे. हरभऱ्याच्या भावात 255 रुपये वाढ करून  4875 रुपये प्रति क्विंटल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 21, 2020, 5:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading