मराठी बातम्या /बातम्या /देश /अरे बापरे! थरथर कापू लागले रुग्ण, तापही भरला; Black Fungus वरील प्रभावी औषधाचाच भयंकर दुष्परिणाम

अरे बापरे! थरथर कापू लागले रुग्ण, तापही भरला; Black Fungus वरील प्रभावी औषधाचाच भयंकर दुष्परिणाम

ब्लॅक फंगस रुग्णांमध्ये (Black fungus) अँम्फोटेरिसीन बी (amphotericin b) इंजेक्शनचे भयंकर असे दुष्परिणाम दिसून आले आहेत.

ब्लॅक फंगस रुग्णांमध्ये (Black fungus) अँम्फोटेरिसीन बी (amphotericin b) इंजेक्शनचे भयंकर असे दुष्परिणाम दिसून आले आहेत.

ब्लॅक फंगस रुग्णांमध्ये (Black fungus) अँम्फोटेरिसीन बी (amphotericin b) इंजेक्शनचे भयंकर असे दुष्परिणाम दिसून आले आहेत.

भोपाळ, 07 जून : कोरोनाव्हायरससह ब्लॅक फंगसच्या (Black fungus) रुग्णांचंही नवं आव्हान समोर आहे. ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर प्रभावी औषध म्हणजे अँम्फोटेरिसीन बी (amphotericin b). पण आता या औषधाचेच गंभीर दुष्परिमाण  (amphotericin b side effects) दिसू लागले आहेत. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे.

मध्य प्रदेशमध्ये (Madhya pradesh) ब्लॅक फंगस रुग्णांमध्ये अँम्फोटेरिसीन बी इंजेक्शनचे भयंकर असे दुष्परिणाम दिसून आले आहेत. हे इंजेक्शन दिल्यानंतर थंडी, ताप, उलटीची समस्या उद्भवू लागली. इंदोर, सागर आणि जबपूरमध्ये इंजेक्शनचे असे गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ब्लॅक फंगसचे रुग्ण इंजेक्शन घेतल्यानंतर थरथर कापू लागले. त्यांना इतकी थंडी लागली की 6 पांघरूण घेऊनही त्यांची थंडी कमी झाली नाही. इंदोरमधील महाराजा यशवंतराव रुग्णालय, सागरमधील बुंदेलखंड मेडिकल कॉलेज आणि जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये अशी बरीच प्रकरणं दिसून आली.

हे वाचा - कोरोनाच्या उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नवी गाईडलाईन, वाचा सविस्तर

महाराजा यशवंतराव रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की, ब्लॅक फंगसवरी इंजेक्शन दिल्यानंतर 40 टक्के रुग्णांमध्ये दुष्परिणाम दिसून आले. दोन किंवा तीन डोस दिल्यानंतर त्यांच्यात अशी लक्षणं दिसून येत आहेत. यामध्ये बहुतेक रुग्णांना उलटी, चक्कर, शरीर थरथरणं अशी समस्या दिसते आहे.  त्यांच्यावर सध्या लक्ष ठेवलं जात आहे.

बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये सध्या ब्लॅक फंगसचे 27 रुग्ण आहेत. त्या सर्वांना हे इजेक्शन देण्यात आलं. या इंजेक्शनच्या दुष्परिणाम दिसून येताच हे औषध देणं थांबवण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की रुग्णांवर इंजेक्शनचं रिअॅक्शन दिसून येत आहे. आता त्यांना इंजेक्शनऐवजी दुसरं औषध दिलं जात आहे.

हे वाचा - Corona Vaccine: ‘कोव्हॅक्सिन’ की ‘कोव्हिशिल्ड’; कोणती लस अधिक प्रभावी?

जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये या इंजेक्शनमुळे 60 रुग्णांची हालत खराब झाली आहे. या रुग्णालयात ब्लॅक फंगसचे जवळपास 126 रुग्ण दाखल आहेत. माहितीनुसार दोन वॉर्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांना इंजेक्शन दिल्यानंतर 10 मिनिटांत थरथरल्यासारखं वाटू लागलं. त्यांना ताप, उलटी होऊ लागली, भीती वाटू लागली. यानंतर या रुग्णांना अँटी-रिअॅक्शन औषध देण्यात आलं, ज्यामुळे त्यांना आराम मिळाला.

First published:

Tags: Coronavirus, Health, Madhya pradesh, Serious diseases