मराठी बातम्या /बातम्या /देश /वाफ घेऊ नका, ताप आला तरच पॅरासिटामॉल घ्या, आरोय मंत्रालयाची नवी गाईडलाईन

वाफ घेऊ नका, ताप आला तरच पॅरासिटामॉल घ्या, आरोय मंत्रालयाची नवी गाईडलाईन

देशात कोरोना व्हायरसची (Coronavirus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येताना दिसतेय. त्याच दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना उपचारांवरील नवीन गाईडलाईन्स जारी केली आहे.

नवी दिल्ली, 07 जून: देशात कोरोना व्हायरसची (Coronavirus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येताना दिसतेय. त्याच दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना उपचारांवरील नवीन गाईडलाईन्स जारी केली आहे. रुग्णांमध्ये (Corona Patients)असलेली कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा सौम्य नसलेल्या उपचारासाठी ही सुधारित गाईडलाईन आहे. याअंतर्गत अँटीपायरेटिक आणि एंटीट्यूसिव्ह वगळता इतर सर्व औषधे काढून टाकण्यात आली आहेत.

तसंच कोरोनाच्या उपचारावेळी हायड्रोक्सोक्लोरोक्वीन, अँटीबॉयोटिक्स आणि व्हिटामिन्स सारखी औषधांचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. यासह गाईडलाईनमध्ये स्टिरॉइड्स, पॅरासिटामॉल आणि ऑक्सिजनच्या योग्य वापरावर भर देण्यात आला आहे.

हेही वाचा- प्रत्यार्पण टाळण्यासाठी मेहुल चोक्सीनं लढवली होती 'ही' शक्कल

विशेष म्हणजे सुधारित गाईडलाईनमध्ये वाफ घेण्यास मनाई करण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या उपचारात वाफ घेणे खूप फायदेशीर मानलं जातं होतं. तसंच या गाईडलाईनमध्ये प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली आहे.

काय आहे नव्या गाईडलाईनमध्ये

वाफ घेऊ नये.

कोणतेही अँटीबॉयोटिक्स घ्यायचे नाही.

कोणतीही झिंक आणि व्हिटामिनची गोळी घ्यायची नाही.

ताप आल्यावरच फक्त पॅरासिटामॉल गोळी घ्यायची.

DGSS वेबसाइटवर सुधारित गाईडलाईन

डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेजच्या वेबसाईटवर ही सुधारित गाईडलाईन सूचना देण्यात आली आहे. उपचाराचा सविस्तर अहवाल 27 मे रोजी वेबसाइटवर अपलोड करण्यात आला. मात्र अद्याप सुधारित गाईडलाईन आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेले नाही.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus