अहमदाबाद, 04 डिसेंबर: देशात कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट (Corona virus new variant) ओमिक्रॉनच्या रुग्णात (Omicron cases) वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी कर्नाटकातील दोन जणांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचं (Omicron cases in karnataka) आढळलं आहे. यानंतर आता आणखी एका राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. शनिवारी, गुजरातमधील जामनगरमधील एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं आढळून (Omicron cases in gujrat) आलं आहे. संबंधित व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून भारतात आली होती. 28 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर ते जामनगरला गेले होते.
त्यांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी केल्यानंतर त्यांना ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. त्यामुळे आता ओमिक्रॉनबाबत गुजरातमध्ये दक्षता वाढवण्यात आली असून आता भारतात ओमिक्रॉन बाधित रुग्णाचा आकडा तीनवर पोहोचला आहे. याआधी कर्नाटकात ओमिक्रॉन बाधित दोन रुग्ण आढळले आहेत. दोन्ही संक्रमित रुग्ण पुरुष असून त्यांचं वय 66 आणि 46 वर्षे इतकं आहे. संबंधित रुग्णांमध्ये ओमिक्रॉन संसर्गाची सौम्य लक्षणं आढळून आली आहेत.
हेही वाचा-Omicron रोखण्यासाठी BMCचा अॅक्शन प्लॅन, परदेशातून येणाऱ्यांसाठी 5 सूत्री योजना
दुसरीकडे, कर्नाटकात ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळल्यानंतर, राज्य सरकारने शुक्रवारी 66 वर्षीय दक्षिण आफ्रिकन नागरिकाच्या चाचणी अहवालाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर संबंधित व्यक्तीला भारत देश सोडण्याची परवानगी देण्यात आली. तसेच बेंगळुरूला पोहोचल्यानंतर किमान 10 दक्षिण आफ्रिकन नागरिक बेपत्ता झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. संबंधितांचा तात्काळ शोध घेण्याचं आणि त्यांची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
हेही वाचा-'भारतात ओमिक्रॉनचं आधीपासूनच अस्तित्व'; लशीबाबतही शास्त्रज्ञांनी दिली माहिती
त्याचबरोबर, ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर संसदीय समितीनं कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या प्रभावाबद्दल मूल्यांकन करण्याची शिफारस केली आहे. आरोग्यविषयक संसदीय स्थायी समितीनं शुक्रवारी आपला अहवाल सादर केला. या अहवालात म्हटलं की, विषाणूच्या नवीन व्हेरिएंटला रोखण्यासाठी सरकारने अधिक संशोधन करण्याची गरज आहे. तसेच लसींचा बूस्टर डोस देण्याबाबत देखील चाचपणी करण्याची शिफारसही यात करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread