Home /News /coronavirus-latest-news /

'भारतात ओमिक्रॉन बाहेरून आला नाही तर आधीपासूनच अस्तित्व'; लशीच्या प्रभावाबाबतही शास्त्रज्ञांनी दिली माहिती

'भारतात ओमिक्रॉन बाहेरून आला नाही तर आधीपासूनच अस्तित्व'; लशीच्या प्रभावाबाबतही शास्त्रज्ञांनी दिली माहिती

गुरुवारी (2 डिसेंबर) कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron in Karnataka) दोन रुग्ण आढळून आले होते. त्यातल्या 46 वर्षांच्या रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती.

नवी दिल्ली 04 डिसेंबर : जगभरात सध्या थैमान घातलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटचे (Omicron variant in India) रुग्ण आता भारतातही आढळले आहे. पण देशात आढळलेल्या एका रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री (Omicron Detected in patient with no travel history) नसतानाही त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. म्हणजेच ओमिक्रॉन हा परदेशातून भारतात येण्याआधीपासूनच मोठ्या शहरांमध्ये अस्तित्वात होता, असं मत सीएसआयआर-सीसीएमबीचे (CSIR-CCMB) संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी व्यक्त केलं आहे. ते न्यूज18 शी बोलत होते. ओमिक्रॉनचा संसर्ग (Omicron more transmissible) मोठ्या प्रमाणात होत असला, तरी त्याची लक्षणं अगदीच सौम्य असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ओमिक्रॉन हा विषाणू सर्वांत प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. तिथून तो इतर देशांमध्ये पसरल्याचं सांगितलं जात आहे. मोठ्या शहरांमध्ये आधीपासूनच ओमिक्रॉन उपस्थित सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) ही हैदराबादमधली एक संशोधन संस्था आहे. भारत सरकारच्या सीएसआयआर (CSIR) या संस्थेअंतर्गत ही संस्था काम करते. गुरुवारी (2 डिसेंबर) कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron in Karnataka) दोन रुग्ण आढळून आले होते. त्यातल्या 46 वर्षांच्या रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. “याचाच अर्थ देशात ओमिक्रॉन बाहेरून नाही आला, तर तो आधीपासूनच इथे आहे. कदाचित आपल्याला जे रुग्ण सापडले आहेत, त्यांव्यतिरिक्त देशातल्या आणखी मोठ्या शहरांमध्येही हा विषाणू उपस्थित (Omicron already present in big cities of India) असावा,” असं डॉ. मिश्रा म्हणाले. “यामुळे आता देशभरात मोठ्या स्तरावर मॉनिटरिंग आणि जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) करण्याची गरज आहे; पण यात चांगली गोष्ट ही आहे, की ओमिक्रॉन देशात उपस्थित असूनही रुग्णालयांमध्ये भरती होण्याचं किंवा मृत्यूचे प्रमाण त्यामुळे वाढलेलं दिसत नाहीये,” असंही ते म्हणाले. भारतीयांसाठी वेक-अप कॉल ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळणं हा खरं तर भारतीयांसाठी वेक-अप कॉल असल्याचं डॉ. मिश्रा यांनी म्हटलं आहे. “दुसरी लाट ओसरल्यामुळे किंवा लसीकरण झाल्यामुळे भारतीयांनी पुन्हा निष्काळजीपणा करण्यास सुरुवात केली होती. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा देशातले नागरिक कोरोनाविरुद्धची योग्य ती खबरदारी बाळगण्यास सुरुवात करतील. आतापर्यंत समोर आलेल्या अभ्यासांनुसार, खरंच याची लक्षणं सौम्य असतील, तर हा व्हेरिएंट आपल्यासाठी वरदान (Omicron could be a blessing) ठरू शकतो,” असं डॉ. मिश्रा म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशी जी खबरदारी बाळगत होतो, ती कायम ठेवण्याची गरज आहे. तसंच, देशात मोठ्या स्तरावर आणि जलद गतीने जीनोम सीक्वेन्सिंग करण्याची गरज आहे, असं मिश्रा यावेळी म्हणाले. देशातल्या लसीकरण मोहिमेमुळेच आज आपण कोरोनाला चांगल्या रीतीने थोपवलं (India against Corona) असल्याचंही ते म्हणाले. “लसीकरण हे एका हेल्मेटप्रमाणे काम करतं. जसं हेल्मेटमुळे अपघात होणं टळत नाही, तसंच लसीकरणामुळे कोरोनाची लागण होणं टळत नाही; पण हेल्मेट अपघातात आपले प्राण वाचवू शकतं, तसंच लसीकरण कोरोनापासून आपलं रक्षण करतं,” असं मिश्रा यांनी यावेळी स्पष्ट केलं. “लस घ्यावी की नाही हा वादाचा मुद्दा असूच शकत नाही. लस घेणं हे सर्वांसाठी अनिवार्य असावं. कोणी लसीकरणाला विरोध करत असेल, तर ती व्यक्ती विषाणूला पाठिंबा दर्शवत आहे, म्हणजेच नागरिकांच्या विरोधात आहे असं समजलं जावं,” असं ते पुढे म्हणाले. देशातल्या सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना डॉ. मिश्रा म्हणाले, की सेरो पॉझिटिव्हिटी रेट उच्च आहे, तसंच निम्म्याहून अधिक जनतेचे पूर्ण लसीकरण झालं आहे. सुमारे 80 टक्के प्रौढांनी पहिला डोस घेतला आहे. पहिल्या लाटेमध्ये कोरोनाची लागण होऊन त्यातून बरे झालेल्यांची संख्याही मोठी आहे. या सगळ्या कारणांमुळे ओमिक्रॉनला तोंड देण्यासाठी (India against Omicron) आपण खरं तर सज्ज आहोत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवर नीट लक्ष ठेवलं आणि लसीकरणाचा वेग कायम ठेवला तर आपण ओमिक्रॉनवर सहज मात करू शकतो.
First published:

Tags: Corona spread, Corona updates

पुढील बातम्या