• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ठाण्यातील तरुणीचं जोधपूरच्या तरुणाशी झालं धडाक्यात लग्न; 8 दिवसांतच वधूनं दाखवला रंग

ठाण्यातील तरुणीचं जोधपूरच्या तरुणाशी झालं धडाक्यात लग्न; 8 दिवसांतच वधूनं दाखवला रंग

जोधपूर येथील एका तरुणाचं लग्नानंतर अवघ्या 8 दिवसांतच स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे.

जोधपूर येथील एका तरुणाचं लग्नानंतर अवघ्या 8 दिवसांतच स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे.

Crime in Jodhpur: जोधपूर येथील एका तरुणाचं लग्नानंतर अवघ्या 8 दिवसांतच स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. लग्नानंतर आठ दिवसांतच वधूनं आपला खरा रंग दाखवला आहे.

 • Share this:
  जोधपूर, 16 ऑगस्ट: लग्न करून सुखी संसार करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. लग्नाचा दिवस आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी धडाक्यात लग्न केलं जातं. त्यासाठी काही महिने अगोदरच तयारी केली जाते. पण जोधपूर येथील एका तरुणानं धडाक्यात लग्न केल्यानंतर अवघ्या 8 दिवसांतच त्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. लग्नानंतर आठ दिवसांतच वधूनं आपला खरा रंग दाखवला आहे. महाराष्ट्रातील ठाणे (Thane) येथील रहिवासी असणाऱ्या नववधूनं राजस्थानमधील जोधपूरच्या (Jodhpur) एका तरुणाला गंडा  घातला आहे. आरोपी वधूनं जोधपूरच्या तरुणाशी लग्न केल्यानंतर आठच दिवसांत घरातील सर्व दागिने आणि रोकड घेऊन पोबारा (Theft Ornaments and Money) केला आहे. या प्रकरणी पीडित वरानं जोधपूर येथील बनाड पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR Lodged) दाखल केला आहे. बनाड पोलीस आरोपी वधूचा तपास करत असून अद्याप तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. पोलीस आरोपी नववधूचा शोध घेत आहेत. हेही वाचा-अचानक साप दिसला अन् काळजाचा ठोका चुकला; नगरमध्ये कड्यावरून कोसळून मुलाचा मृत्यू नेमकं काय घडलं? काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील रेणुका नावाच्या एका मुलीचा विवाह राजस्थानातील जोधपूर येथील रहिवासी असणाऱ्या भोमाराम सोनी याच्याशी ठरला होता. फिर्यादी भोमाराम याच्या वडिलांनी विवाहात मध्यस्थी करणाऱ्यांना विवाहाचं नियोजन करण्यासाठी 2 लाख 10 हजार रुपयांची रक्कम दिली होती. त्यांनी विवाह उत्तमरित्या पार पाडला. पण लग्नानंतर आठच दिवसात नववधून घरातील दागिने आणि रोकडं घेऊन फरार झाली आहे. सासरच्या मंडळींनी 12 ऑगस्ट रोजी नववधू घरातून गायब झाल्यानंतर तिचा सर्वत्र शोध घेतला. पण वधूचा काही थांगपत्ता लागला नाही. हेही वाचा-चिकन शिजवण्यासाठी गॅसवर ठेवलं पाणी, काही वेळात त्यात उकळताना दिसली स्वतःची मुलगी त्यानंतर भोमाराम यांनी जोधपूर येथील बनाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी नववधूनं घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि 42 हजार रुपयांची रोकड घेऊन पळून गेल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपी वधू रेणुकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी वधूचा कसून शोध घेत आहेत. पण लग्नानंतर अवघ्या 8 दिवसात नववधू आपल्या पतीच्या हातावर तुरी देऊन फरार झाली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: