जाहिरात
मराठी बातम्या / देश / चहापत्ती समजून वापरलं विषारी औषध, भाऊबीजेच्या दिवशीच दोन भावांचा शेवट, 5 जणांचा मृत्यू

चहापत्ती समजून वापरलं विषारी औषध, भाऊबीजेच्या दिवशीच दोन भावांचा शेवट, 5 जणांचा मृत्यू

चहापत्ती समजून वापरलं विषारी औषध, भाऊबीजेच्या दिवशीच दोन भावांचा शेवट, 5 जणांचा मृत्यू

ही घटना मैनपुरीच्या नागला कन्हाई गावातील आहे.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

मैनपुरी, 27 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी विषारी चहा पिल्याने दोन लहान मुलांसह कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चहा बनवण्यासाठी तणनाशकाचा वापर चहापत्तीमध्ये झाला होता. त्यामुळे ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना मैनपुरीच्या नागला कन्हाई गावातील आहे. पोलीस अधीक्षक कमलेश दीक्षित यांनी सांगितले की, शिवानंदन (35), त्यांची मुले शिवांग (सहा) आणि दिव्यांश (पाच), सासरे रवींद्र सिंग (55) आणि आणि शेजारी सोबरन (42) यांची तब्येत बिघडली आहे. कन्हाई गावात घरी बनवलेला चहा प्यायल्यानंतर ही दुर्घटना घडली. या पाच जणांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी रवींद्र, शिवांग आणि दिव्यांश यांना मृत घोषित केले, अशी माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली. ते पुढे म्हणाले की, सोबरन आणि शिवनंदन यांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना सैफई येथे रेफर करण्यात आले, जिथे दोघांचाही मृत्यू झाला. हेही वाचा -  संतापजनक! पत्नी गळफास घेत असताना पतीचं धक्कादायक कृत्य, वाचून बसणार नाही विश्वास दरम्यान, प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, शिवानंदनची पत्नी राममूर्ती यांनी भातावर फवारण्यात आलेले तणनाशक नकळत चहापत्ती समजून वापरुन टाकले. त्यामुळे चहा विषारी झाला आणि ही धक्कादायक घटना घडली, असे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात