मराठी बातम्या /बातम्या /देश /

Counterfeit Notes: नोटबंदीच्या 6 वर्षांनंतरही बनावट नोटा चलनात, 500 रुपयांच्या नोटा सर्वाधिक

Counterfeit Notes: नोटबंदीच्या 6 वर्षांनंतरही बनावट नोटा चलनात, 500 रुपयांच्या नोटा सर्वाधिक

Counterfeit Notes: नोटबंदीच्या 6 वर्षांनंतरही बनावट नोटा चलनात,  500 रुपयांच्या नोटा सर्वाधिक

Counterfeit Notes: नोटबंदीच्या 6 वर्षांनंतरही बनावट नोटा चलनात, 500 रुपयांच्या नोटा सर्वाधिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारनं घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांपैकी एक नोटबंदीचा निर्णय. 8 नोव्हेंबर 2016 ला हा निर्णय लागू झाला. देशात असलेल्या चलनातील बनावट नोटा (Counterfeit Notes) बाद करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र हा उद्देश पूर्ण झाला नाही.

पुढे वाचा ...

मुंबई, 02 जून: देशाची आर्थिक व्यवस्था ही देशाच्या प्रगतीच्या अनेक परिमाणांपैकी एक असते. सामान्य नागरिकाचं जीवनमान किती उंचावलं हे जसं आपण पाहतो आणि त्यामुळे विकास झाला म्हणतो तसंच आर्थिक विकास किती झाला हे पाहून आणि देशाच्या विकासाबाबत अंदाज लावू शकतो. कोविड महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कमी झाली होती पण आता देशातील व्यवहार सुरू झाल्यानंतर ती रूळावर येत आहे. या आधीही केंद्रातील सरकारने आर्थिक सुधारणेच्या दृष्टिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता तो म्हणजे नोटबंदीचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारनं घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांपैकी एक नोटबंदीचा निर्णय. 8 नोव्हेंबर 2016 ला हा निर्णय लागू झाला. देशात असलेल्या चलनातील बनावट नोटा (Counterfeit Notes) बाद करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र हा उद्देश पूर्ण झाला नाही. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर नजर टाकल्यास बनावट नोटांचं चलन किती वाढलं आहे, हे लक्षात येईल. एबीपी लाईव्हनं त्यासंबंधी वृत्त दिलं आहे. नोटबंदी होऊन सहा वर्षं झाली, तरी बँकिंग व्यवस्थेत बनावट नोटा मिळत आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank Of India) वार्षिक अहवालात देशातील बनावट नोटांची संख्या किती आहे हे दिसतं. इतकंच नाही, तर 500 रुपयांच्या बनावट नोटा सर्वाधिक आहेत, हेही या आकडेवारीवरून स्पष्ट होतं आहे. 2020-21 च्या तुलनेत 2021-2022 या वर्षात 500 रुपयांच्या बनावट नोटांचं प्रमाण 100 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या आर्थिक वर्षात बनावट नोटा सापडण्याचं प्रमाण 10.7 टक्क्यांनी वाढलं आहे. यात 500 रुपयांच्या बनावट नोटा जास्त आहेत. 2020-21 पेक्षा 2021-2022 या वर्षात 500 रुपयांच्या बनावट नोटांचं प्रमाण 101.9 टक्क्यांनी जास्त आहे. तर 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रमाणात 54.16 टक्क्यांची वाढ झाली आहे. बनावट नोटांमुळे देशातील आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण होतात. बँकिंग व्यवहारात कॅश फ्लो वाढल्यामुळे महागाईही वाढते. यामुळे देशात चलनासंदर्भातील गैरव्यवहार वाढतात.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, 10 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 16.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर 20 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत 16.5 टक्के इतकी वाढ झाली आहे. 200 रुपयांच्या खोट्या नोटांची संख्या 11.7 टक्के वाढली आहे. 100 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 16.7 टक्के, तर 50 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 28.7 टक्के इतकी वाढली आहे. या सर्व नोटांपैकी 93.1 टक्के बनावट नोटा इतर बँकांमध्ये सापडल्या आहेत, तर 6.9 टक्के नोटांची खातरजमा रिझर्व्ह बँकेतच करण्यात आली.

नोटबंदीमुळे बनावट नोटा (Counterfeit Notes) व्यवहारातून पूर्ण बाद होतील व गैरव्यवहारांना आळा बसेल, हा चांगला उद्देश यामागे होता. मात्र रिझर्व्ह बँकेची आकडेवारी पाहता तो सफल झालेला दिसत नाही. वर्षागणिक बनावट नोटांची संख्या वाढतेच आहे. त्यासाठी आता कोणता वेगळा मार्ग मोदी सरकार अवलंबणार हे पाहावं लागेल.

First published:

Tags: Pm modi, Rbi