Air Strikeनंतर दहशतवाद्यांना पळता भूई थोडी; या ठिकाणी हलवले तळ

Air Strikeनंतर दहशतवाद्यांना पळता भूई थोडी; या ठिकाणी हलवले तळ

Air Strikeनंतर दहशतवाद्यांनी आपले तळ अफगणिस्तान येथे हलवले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 जुलै : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायु दलानं POKमध्ये घुसून Air Strike केला. त्यामध्ये शेकडो दहशतवादी ठार झाले. शिवाय, जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाचे तळ देखील उद्धवस्त झाले. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईनंतर दहशतवाद्यांनी हाय खाल्ली असून त्यांनी आपले तळ आता अफगणिस्तानच्या कुनार, नंगरहार, नूरिस्तान आणि कंधार इथे हलवले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रानं याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलानं बालाकोट येथे Air Strike केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध देखील ताणले गेले होते.

दहशतवाद्यांना दिली जातेय ट्रेनिंग

पाकिस्तानातील या दहशतवादी गटांनी अफगणिस्तानमधील दहशतवादी गटांशी हातमिळवणी केली आहे. आता दहशतवाद्यांना अफगणिस्तानमध्ये ट्रेनिंग दिली जात आहे. सध्या पाकिस्तानवर दहशतवादी गटांवर कारवाई करा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दबाव टाकला जात आहे. त्यानंतर पाकिस्ताननं देखील वचन देत काही दहशतवादी गटांवर कारवाई केली आहे.

राफेल विमानांना कबुतरांपासून धोका; IAFनं व्यक्त केली चिंता

पुलवामा हल्ला

14 फेब्रुवारी रोजी भारतीय सैन्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय वायु दलानं कारवाई करत बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. यामध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाले. भारतीय वायु दलानं केलेली कारवाई पूर्णपणे नियोजनबद्ध होती. कारण, पाकिस्तानी वायु दलाला त्याचा थांगपत्ता देखील लागला नाही. त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला मात्र यश आलं नाही. भारतानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं. यावेळी पाकिस्ताननं विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेतलं. पण, दबाव पाहता त्यांना देखील पाकिस्ताननं सोडून दिलं.

VIDEO: मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये पूरस्थिती, नागरिकांचे हाल

First published: July 7, 2019, 11:57 AM IST

ताज्या बातम्या