मराठी बातम्या /बातम्या /देश /एअर इंडियानंतर इंडिगो कंपनीनेही दिली 500 विमानांची ऑर्डर

एअर इंडियानंतर इंडिगो कंपनीनेही दिली 500 विमानांची ऑर्डर

एअर इंडियानंतर इंडिगो कंपनीनेही दिली 500 विमानांची ऑर्डर

एअर इंडियानंतर इंडिगो कंपनीनेही दिली 500 विमानांची ऑर्डर

देशातली सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने एअर इंडियाची ही कृती गांभीर्याने घेतली आहे. या विमान कंपनीने युरोपमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी तुर्की एअरलाइन्सशी हातमिळवणी केली आहे आणि सुमारे 500 विमानांची ऑर्डर दिली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : टाटा समूहाने गेल्या वर्षी एअर इंडिया कंपनी खरेदी केली. त्यामुळे एअर इंडियाचे आता पुन्हा चांगले दिवस येऊ लागले आहेत. या कंपनीने 840 विमानांची ऑर्डर दिली आहे. विमान वाहतूक इतिहासातली ही सर्वांत मोठी ऑर्डर आहे. लवकरच भारतातून जगातल्या प्रत्येक शहरात नॉन-स्टॉप उड्डाणं सुरू केली जातील, असा एअर इंडियाचा दावा आहे. एअर इंडियाच्या या निर्णयामुळे एव्हिएशन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संदर्भात एका वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.

    देशातली सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने एअर इंडियाची ही कृती गांभीर्याने घेतली आहे. या विमान कंपनीने युरोपमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी तुर्की एअरलाइन्सशी हातमिळवणी केली आहे आणि सुमारे 500 विमानांची ऑर्डर दिली आहे. इंडिगो एअरलाइन दररोज सुमारे 1,800 उड्डाणं चालवते. त्यापैकी 10 टक्के इंटरनॅशनल रूट्सवर आहेत. सध्या देशांतर्गत वाहतुकीमध्ये इंडिगोचा वाटा 56.1 टक्के आहे, तर टाटा समूहाच्या तीन विमान कंपन्यांचा एकत्रित वाटा 24.1 टक्के आहे. इतर एअरलाइन्सचा 19.8 टक्के वाटा आहे. टाटा समूहाच्या विमान कंपन्यांमध्ये एअर इंडिया, विस्तारा आणि एअर एशिया इंडिया यांचा समावेश आहे.

    राजधानी दिल्लीत घुमला 'जय शिवाजी, जय भवानी'चा जयघोष; शिवजयंतीचे खास Photo

    इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स म्हणाले, की कंपनी आता इंटरनॅशनल रूट्सवर लक्ष केंद्रित करत आहे. इंडिगो नैरोबी, जकार्ता आणि काही मध्य आशियातल्या ठिकाणी उड्डाणं सुरू करण्याचा विचार करत आहे. भारतीय बाजारपेठेत पुढे जाण्याची प्रचंड क्षमता आहे आणि अनेक एअरलाइन्ससाठी जागा आहे. भारताच्या एव्हिएशन सेक्टरमध्ये खूप काही घडत आहे. यामध्ये एअर इंडिया ग्रुपच्या कन्सॉलिडेशनचा समावेश आहे. एकूणच, भारताचं एव्हिएशन क्षेत्र पुढच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. हा बाजाराचा नैसर्गिक विकास आहे.

    स्पर्धा होणं का चांगलं आहे?

    अल्बर्स म्हणाले, 'मला स्पर्धा हवी आहे. स्पर्धा असणं चांगलं आहे, परंतु ही अशी स्पर्धा असेल, जी बाजारातल्या वाढीबरोबरच चालणार आहे. इंडिगोकडे 300हून अधिक विमानं आहेत आणि सध्या 76 देशांतर्गत आणि 26 आंतरराष्ट्रीय ठिकाणी आमच्या कंपनीची विमानं जातात. इंडिगोने नाशिक आणि धर्मशाला इथेही विमानं जाणार असल्याची घोषणा नुकतीच केली आहे. भारतातलं एव्हिएशन मार्केट खूप व्हायब्रंट आहे. त्यात खूप चांगल्या सुधारणा होत आहे. इंडिगोने जोरदार पुनरागमन केलं आहे आणि भारताच्या आर्थिक विकासामुळे ती आणखी वाढण्यास मदत होत आहे.'

    इंडिगोच्या इंटरनॅशनल सेल्सचे प्रमुख विनय मल्होत्रा यांनी सांगितलं, की इंडिगोने आणखी 500 विमानांची ऑर्डर दिली आहे. तसंच, कंपनीने युरोपमधल्या फ्लाइट वाढवण्यासाठी तुर्की एअरलाइन्सशी हातमिळवणी केली आहे. इंडिगो एअरलाइन्स सध्या दररोज सुमारे 1,800 फ्लाइट ऑपरेट करते. त्यापैकी 10 टक्के इंटरनॅशनल रूट्सवर आहेत. आता कंपनी इंटरनॅशनल रूट्सवरच्या आपल्या फ्लाइट्सची संख्या वाढवेल.

    First published:
    top videos

      Tags: Air india, Airplane, Tata group