जाहिरात
मराठी बातम्या / देश / राजधानी दिल्लीत घुमला 'जय शिवाजी, जय भवानी'चा जयघोष; शिवजयंतीचे खास Photo

राजधानी दिल्लीत घुमला 'जय शिवाजी, जय भवानी'चा जयघोष; शिवजयंतीचे खास Photo

शिवजयंतीचे खास Photo

शिवजयंतीचे खास Photo

छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती राजधानीत जल्लोषात साजरी करण्यात आली.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती राजधानीत जल्लोषात साजरी करण्यात आली. बाल शिवाजीच्या जन्मोत्सवी पाळण्याने, ढोल-ताशांच्या गजराने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या उत्स्फुर्त घोषणांनी महाराष्ट्र सदन दुमदुमले.

शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती दिल्लीच्या वतीने येथील कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आज शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या प्रवेश भागातील केंद्रीयस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा विराजमान करण्यात आली.

या ठिकाणी कोल्हापूर येथील छत्रपती परिवारातील युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात सहभाग घेऊन शिवजन्माचा पाळणा गायला. यानंतर पालखी पुजन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी निवासी आयुक्त, डॉ. निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सदनाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाजवळ आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ.अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचा-यांनी व दिल्ली राजधानी क्षेत्र, हरियाणा, उत्तर प्रदेशातून या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

ढोल ताशांच्या गजराने सदनाचे वातावरण दुमदुमले. सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने वातावरण निनादले. नाशिक येथील वादकांच्या ढोल पथकात सहभागी तरुणाईंचा उत्साह व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या वाद्यवृदांच्या सादरीकरणाने उपस्थितांनी ठेका धरला.

संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात