• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Maharashtra Rain Update: पुढील 24 तासात मुंबईसह ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update: पुढील 24 तासात मुंबईसह ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update: दोन दिवसांपासून राज्यात (Maharashtra Rain) पावसाची रिपरिप सुरु आहेच.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑगस्ट: येत्या 24 तासात मुंबईसह (Mumabi) कोकण (Kokan) आणि नाशिक (Nashik) मध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain)होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे. दोन दिवसांपासून राज्यात (Maharashtra Rain) पावसाची रिपरिप सुरु आहेच. विदर्भासह तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं हा पाऊस होणार असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. आता पुन्हा हवामान खात्यानं मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही चांगला पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 22 ऑगस्ट कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मराठवाडा - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता एकच नंबर! लसीकरणात राज्याचा नवा विक्रम, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक 23 ऑगस्ट कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता विदर्भ - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
  Published by:Pooja Vichare
  First published: