नवी दिल्ली, 17 ऑगस्ट: तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा (Taliban control Afghanistan) मिळाल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. अफगाणिस्तानात अडकलेले अनेक लोक आपला देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चहुबाजूंनी मार्ग बंद केल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत काही लोक आधीच अफगाणिस्तान सोडून अन्य देशात आले आहेत. उमेद हा असाच एक अफगाण नागरिक आहे, जो पाच महिन्यांपूर्वी भारतात आला होता. या ठिकाणी आल्यानंतर त्यानं आता दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये फ्रेंच फ्राईज विकण्याचं (Sell French Fries in Delhi) काम सुरू केलं आहे. जर अफगाणिस्तानात परत गेलो तर ते आपल्याला जिवंत ठेवणार नाहीत, अशा भावना त्यानं व्यक्त केल्या आहेत. उमेद हा अफगाणिस्तानच्या स्पेशल फोर्सचा (Afghan Special Force) सैनिक होता. NBT च्या वृत्तानुसार, तो आता दिल्लीत फ्रेंच फ्राईज विकून दिवसाला जवळपास 300 रुपयांची कमाई (Earn 300 Rs Per Day) करत आहे. शिवाय तो आता हिंदी भाषा शिकण्याचाही प्रयत्न करत आहे. उद्या काय होईल याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही. तो चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. पण सुरुवात कुठून आणि कशी करायची याचं उत्तरही त्यांच्याकडे नसल्याचं उमेदनं सांगितलं आहे. हेही वाचा- तालिबानचं वार्षिक उत्पन्न वाचून व्हाल थक्क, तीन ठिकाणांहून होते मजबूत कमाई उमेदनं पुढे सांगितलं की, तालिबानसोबतच्या लढ्यात युद्धभूमीवर मरण पावलेल्या मित्रांची आपल्याला खूप आठवण येते. त्यानं पुढं सांगितलं की, आपण दोन वर्षांचा असताना त्याचे आई -वडील एका रस्ते अपघातात मरण पावले आहेत. यानंतर त्यानं 18 व्या वर्षी अफगाणिस्तान सैनिकात दाखल झाला होता. आता तो निर्वासित कार्डाच्या मदतीनं दिल्लीत राहत आहे. हेही वाचा- अफगाणिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांचं भवितव्य काय? तालिबानची मोठी घोषणा उमेदनं पुढं सांगितलं की, अफगाण सैन्यात काम करताना आपण अनेक ठिकाणी तैनात होतो. त्यानं लढताना अनेक तालिबान सैनिकांना ठार केलं आहे. यामुळेच तो आता तालिबानच्या हिटलिस्टवर आहे. त्याच्याकडे युद्धभूमीवरील काही व्हिडिओ देखील आहेत. पण अफगाणिस्तानात परत गेलो, तर जीवंत परतणार नाही. तालिबान मला जिवंत सोडणार नाही, असंही त्यानं म्हटलं आहे. यावेळी त्यानं आपल्या शरीरावरील जखमाही दाखवल्या आहेत. तालिबानशी लढताना त्याला कधीही गोळी लागली नाही. पण छर्रे अनेकदा लागले असल्याचं त्यानं सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.