चेन्नई, 7 फेब्रुवारी : आजच्या आधुनिक काळातही लोकांना जात-धर्म नेहमीच महत्त्वाचा वाटतो. गुणवत्तेपेक्षाही जाती-धर्माला लोक प्राधान्य देताना दिसतात. मात्र या मानवी प्रवृत्तीला छेद देणारं एक उदाहरण समोर आलं आहे.
मॅक्स महाराष्ट्रानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. तामिळनाडूमधल्या (Tamilnadu) 35 वर्षीय एम. ए. स्नेहा जात आणि धर्माचा पूर्णतः त्याग केला आहे. आता देशातील पहिल्या जात-धर्ममुक्त व्यक्ती झाल्या आहेत. स्नेहा या व्यवसायानं वकील (advocate) आहेत. त्यांनी जन्मदाखल्यावरील जात (caste) आणि धर्माचे (religion) कॉलम रिकामे सोडलेले आहेत. त्यांच्या या मुक्ततेवर सरकारनेही (government) शिक्कामोर्तब केलं आहे. तामिळनाडू सरकारनं स्नेहा यांना एक प्रमाणपत्र दिलं आहे. यात म्हटलं आहे, की स्नेहा या जात आणि धर्मापासून पूर्णतः मुक्त आहेत. अशाप्रकारे सरकारने जात-धर्म मुक्त म्हणून जाहीर केलेल्या त्या देशातल्या (country) पहिल्या व्यक्ती आहेत.
हे ही वाचा-पंतप्रधान मोदींची इच्छा पूर्ण होणार! 'मेड इन इंडिया' Covid लशीसाठी 25 देश रांगेत
याबाबत स्नेहा म्हणाल्या, की सरकार जात प्रमाणपत्र प्रत्येकाला देतं. मला वाटलं, की आपल्याला सरकार जात-धर्मापासून मुक्त असल्याचं प्रमाणपत्र का देऊ शकणार नाही? त्यानुसार मी अर्ज केला आणि सरकारनंही तसं प्रमाणपत्र दिलं. विशेष म्हणजे माझं कुटुंबही (family) आता या ओळखीतून मुक्त झालं आहे.' स्नेहा यांच्या कुटुंबात आई-वडील, बहिणी आणि मुलींचा समावेश आहे. स्नेहा यांनी आपल्या मुलींची (daughters) नावंही धार्मिक वैविध्य दाखवणारी ठेवली आहेत. अधिराई नसरीन, आदिला इरने आणि आरिफा जेस्सी अशी ही नावं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Religion, Tamil nadu, Woman