अमरावती, 6 फेब्रुवारी : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) शनिवारी अमरावती येथे म्हणाले की, भारताने आतापर्यंत 15 देशांना कोरोनाची लस पुरवली आहे. याशिवाय आणखी 25 देश कोरोना लशीसाठी प्रतीक्षेत आहेत. ते पुढे म्हणाले की, तिसऱ्या श्रेणीतील देशांना भारताकडून कोरोनाची लस हवी आहे. एस. जयशंकर आज महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, भारत कोरोनाच्या लशीबाबत जगाच्या नकाशावर अधोरेखित करण्यात आला आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की, काही गरीब देशांना अनुदानाच्या आधारावर लस पुरवली जात आहे. तर काही देशांना भारतात दिल्या जाणाऱ्या किंमतीत लस हवी आहे. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला जगाच्या फार्मसीच्या स्वरुपात स्थापित करू इच्छित आहेत.
दुसरीकडे केंद्रीय स्वास्थ मंत्रालयाने शनिवारी सांगितलं की, देशात आतापर्यंत 54 लाखांहून अधिक लोकांनी कोरोना - 19 विरोधी लस टोचून घेतली आहे. आतापर्यंत एकूण 54,16,849 लाभार्थींना लस टोचण्यात आली आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 6,73,542 लोकांना लस देण्यात आली असून यानंतर महाराष्ट्रात 4,34,943, राजस्थानात 4,14,422 आणि कर्नाटकात 3,60,592 लोकांना लसीकरण करण्यात आलं आहे.
हे ही वाचा-तुम्हीसुद्धा घेतलंय #CoupleChallenge? मोठ्या संकटाचा धोका; पोलीस म्हणाले...
दरम्यान भारतातील कोरोना (coronavirus in india) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. नव्या कोरोना रुग्णांचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलं आहे. त्यामुळे भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे. पण तरी भारतातचा धोका टळलेला नाही. एका संशोधनातून जी माहिती समोर आली आहे, ती भारताची चिंता वाढवणारी आहे. लँसेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ब्राझीलमधील मॅनॉस शहर ज्याला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या शहरात सर्वाधिक लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधात अँटिबॉडीज सापडल्या आहेत. तिथं कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. कोरोना पुन्हा उलटला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.