मराठी बातम्या /बातम्या /देश /वय वर्ष 3, रात्री झोपेत असतानाच बापाने केला अ‍ॅसिड हल्ला, पण तिच्या जिद्दीला खरंच सलाम! प्रेरणादायी कहाणी वाचाच...

वय वर्ष 3, रात्री झोपेत असतानाच बापाने केला अ‍ॅसिड हल्ला, पण तिच्या जिद्दीला खरंच सलाम! प्रेरणादायी कहाणी वाचाच...

नीतू माहोरे प्रेरणादायी कहाणी

नीतू माहोरे प्रेरणादायी कहाणी

बापाने अ‍ॅसिड हल्ला केलेल्या या तरुणीची कहाणी सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Agra, India

हरिकांत शर्मा, प्रतिनिधी

आग्रा, 27 मार्च : प्रबळ इच्छाशक्ती, समर्पण, मेहनत आणि क्षमता असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते. आग्रा येथील नीतू माहोर हिने या वाक्य जगून दाखवलं आहे. अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर असलेल्या नीतू माहोरेची कहाणी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. तिच्या आयुष्यात आनंदाने जगण्याचे धाडस आणि धडपडही दिसते.

जेव्हा नीतू फक्त 3 वर्षांची होती. ती तिची धाकटी बहीण आणि आईसोबत फतेपूर सिक्री येथील आजीच्या घराबाहेर एका गाडीवर झोपली होती. मात्र, याचवेळी तिचे वडील आणि काका, बाबा त्या आजीच्या घरी आले आणि नीतू, तिची आई आणि लहान बहिणीवर अॅसिड फेकले. या घटनेत आईसह दोन्ही मुली गंभीररित्या भाजल्या होत्या. सर्वात धाकटी मुलगी कृष्णा जी त्यावेळी अवघी दीड वर्षाची होती.

यातच उपचारादरम्यान तिची लहान बहीण कृष्णा हिचा वेदनादायक मृत्यू झाला. तर या घटनेत नीतूची आई गीता देवी आणि नीतू या दोघींचा जीव वाचला. मात्र, या घटनेने त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले होते. दोघांचेही चेहरे पूर्णपणे जळाले तर नीतूच्या डोळ्यांची दृष्टीही गेली. गीता देवी यांना 3 मुली होत्या आणि तिच्या वडिलांना मुलगा हवा होता म्हणून तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. नीतूच्या वडिलांना तिच्या कुटुंबीयांनी भडकावले आणि यानंतर अ‍ॅसिड हल्ला करायला लावला. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांत गुन्हा दाखल केला आणि वडिलांना आणि नातेवाईकांनाही २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

मात्र, पुढे समाजाच्या दबावाखाली खटला मागे घ्यावा लागला. पण काळचक्र गतिमान असतं. वेळ निघून गेली, समाजाच्या टोमट्यांना तोंड देत हिम्मत न गमावलेली नीतू आता नव्याने आयुष्य जगू लागली आहे. नीतूने नुकतेच तिच्या आईच्या नावाने स्टार्टअप उघडले आहे. 'गीता की रसोई' असे त्या स्टार्टअपचे नाव आहे. तिची धाकटी बहीण पूनम, मेहुणे मनीष आणि मनीषचे मित्र तिला या कामात मदत करतात.

" isDesktop="true" id="856334" >

लहानपणी तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकण्यात आले होते, त्यामुळे तिचा चेहरा चांगलाच भाजला होता. दोन्ही डोळ्यांनाही इजा झाली. अनेक शस्त्रक्रिया झाल्या, अजूनही उपचार सुरू आहेत. पण काही उपयोग झाला नाही. त्यामुळे नीतू कधी शाळेत जाऊ शकली नाही, अभ्यास करू शकली नाही. यापूर्वी नीतू आग्राच्या शेरोच्या हँग आउट कॅफेमध्ये काम करायची. पण नीतूला नेहमीच आयुष्य स्वतःच्या जोरावर जगायचं होतं. या कारणास्तव तिने शिरोज हँगआउट मधून नोकरी सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. या स्टार्टअपमध्ये RSS च्या रोजगार भारतीय या प्रकल्पाने नीतूला मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे.

लॉकडाउनने बदललं आयुष्य; हुगळीमधल्या सायकल पानटपरीची सोशल मीडियावर चर्चा

नीतू सांगते की, उन्हाळ्याच्या दिवसात तिच्या चेहऱ्यावर जळजळ होते. पराठे बनवतानाही धूर आणि उष्णता सहन करणे कठीण जाते. पण हे आयुष्यातील कठीण प्रसंग आहेत, ज्यातून तुम्हाला यशापर्यंत पोहोचावे लागते, असे ती म्हणते. जोपर्यंत मुलगा-मुलगी हा भेदभाव आपल्या मनातून निघणार नाही. तोपर्यंत समाज असाच मागे पडत राहील. मुलगा असो किंवा, मुलगी असो. माणूस जन्मापासून संपत्ती आणत नाही. अ‍ॅसिड हल्ल्यावर बोलताना नीतू म्हणते की, घटना घडत आहेत. अॅसिड हल्ला, कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, हे सर्व प्रथम व्यक्तीच्या मनात घडतात. जर मनातून हिंसा निघाली तर ती खऱ्या आयुष्यातही नसेल, असे मत ती व्यक्त करते. तिचा ही कहाणी समाजातील प्रत्येकासाठी अत्यंत प्रेरणदायी आहे.

First published:
top videos

    Tags: Agra, Career, Inspiring story, Local18