हुगळी, 25 मार्च : लॉकडाउनने अनेकांची आयुष्यं बदलली. काहींना आयुष्यभराच्या जखमा या लॉकडाउनने दिल्या, तर काहींच्या आयुष्याला यामुळे नवी कलाटणी, नवी दिशा मिळाली. सोशल मीडियाने अशा अनेकांना प्रसिद्धी दिली. या लोकांच्या आयुष्याच्या कथा अनेकांना प्रेरणा देऊन जातात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हुगळीमध्ये राहणारे किशोरी नावाचे पानवाले सायकलवर पानाची टपरी चालवतात.
त्यांच्या टपरीवर गोड पानापासून फायर पानापर्यंत अनेक प्रकारची पानं मिळतात. सायकलवरून पानटपरी घेऊन फिरताना अनेक जण त्यांचे व्हिडिओ चित्रित करतात व हे व्हिडिओ खूप व्हायरल होतात. त्यामुळे हे किशोरी पानवाले आता सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहेत.
कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाउन लागू करावा लागला. यामुळे अनेकांची आयुष्यं बदलली. 2019 सालापर्यंत किशोरी एका खासगी कंपनीसाठी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. लॉकडाउनमध्ये ते काम थांबलं. जगण्यासाठी काही तरी काम शोधणं त्यांना आवश्यक होतं. त्याच वेळी लालूप्रसाद यादव यांच्या एका शब्दानं त्यांच्या मनाचा ताबा घेतला. त्या ‘खान और पान’ या शब्दानं त्यांचं आयुष्य बदलून टाकलं. पान या शब्दाला त्यांनी जगण्याचा आधार बनवलं.
‘बारा बाजार’मध्ये जाऊन त्यांनी पान बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणलं. स्वतःच्या सायकलवरच पानाची टपरी थाटून त्यांनी घरोघरी पान विकायला सुरुवात केली. त्यातून ते दिवसाला 400 ते 500 रुपये कमावतात. बाली, बेलूर, हिंद मोटर हावडा, हुगळीचा उत्तर भाग या भागात ते सायकलवरून पान विकतात.
हूबेहूब बागेश्वर धामसारखा दरबार चालवताएत त्यांचे शिष्य, पर्चीही काढतात, पाहा PHOTOS
किशोरी यांचं मूळ गाव बिहारमध्ये आहे. तिथे त्यांची पत्नी आणि मुलगा राहतो. किशोरी हिंद मोटर ठिकाणच्या धारसा भागात राहतात. त्या भागातल्या अनेक घरांमधले रहिवासी दुपारपासून किशोरी यांच्या वाटेकडे डोळे लावून बसतात. किशोरी यांच्या सायकलवरच्या पानटपरीवरून पान खाण्याची अनेकांची इच्छा असते. त्यांच्या टपरीवर 10 रुपयांपासून ते 30 रुपयांपर्यंतची पानं मिळतात. त्यांच्या पानटपरीबाबत रितिका दत्ता हिनं वेगळा अनुभव सांगितला. रितिका बरेचदा पान खायची; पण किशोरी यांची सायकलवरची पानटपरी पाहून तिनं पान खाणं बंद केलं होतं; मात्र किशोरी यांच्याकडचं गोड पान खाल्ल्यावर किशोरी यांना 10 पैकी 8 गुण दिले पाहिजेत असं ती सांगते.
गोड पानात कात, चुना, पान चटणी (गोड चटणी), बडिशेप, गुलकंद, वेलची, टुटीफ्रुटी असे विविध पदार्थ घातल्यामुळे हे पान स्वादिष्ट होतं असं किशोरी सांगतात. हे पान आरोग्यदायी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कारण हे पान खाऊन पचनाच्या समस्या कमी होतात. लॉकडाउनमुळे किशोरी यांनी पानटपरीचा व्यवसाय सुरू केला व आज ते सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहेत. हुगळीमध्ये त्यांच्या सायकलवरच्या पानटपरीची भरपूर चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Local18, Lockdown, West bengal