Home /News /national /

राजधानी हादरली! मंदिरात गेलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार; नराधमाने जंगलात नेऊन दिल्या नरक यातना

राजधानी हादरली! मंदिरात गेलेल्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार; नराधमाने जंगलात नेऊन दिल्या नरक यातना

Rape on Minor: भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्ली (Delhi) पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरली आहे. मंदिरात दर्शनासाठी (Minor girl went to visit temple) गेलेल्या एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर परिसरातील एका नराधमाने विकृतीचा कळस गाठला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 18 जानेवारी: भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्ली (Delhi) पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर (Minor girl went to visit temple) परिसरातील एका नराधमाने विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपीनं पीडित मुलीला फूस लावून जवळच्या एका जंगलात घेऊन जात तिला नरक यातना दिल्या (Accused bring minor girl in forest and raped) आहेत. यानंतर आरोपीनं पीडित मुलीला घटनास्थळी जखमी अवस्थेत सोडून पळ काढला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV footage) आधारे आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस आरोपीला अटक करायला गेले असता, नराधम आरोपी पॉर्न फिल्म पाहात बसला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. संबंधित घटना दिल्लीतील अलीपूर भागात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 वर्षीय पीडित मुलगी मुळची बिहार येथील रहिवासी असून तिचं कुटुंब तीन वर्षांपूर्वी दिल्लीत आलं आहे. याठिकाणी पीडित मुलीचे आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. हेही वाचा-पुण्यात टोळक्याची दहशत; हातात हत्यारं घेत वाहनांची तोडफोड, थरारक VIDEO समोर दरम्यान, घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या एका बहिणीसोबत जवळच्या एका मंदिरात गेली होती. यावेळी पायी जात असताना, आरोपी समीर याठिकाणी आला. त्याने फूस लावून पीडित मुलीला जवळच्या एका जंगलात घेऊन गेला. याठिकाणी संधी साधून आरोपीनं पीडित मुलीसोबत विकृतीचा कळस गाठला. बलात्कार केल्यानंतर नराधमाने पीडित मुलीला घटनास्थळी सोडून पळ काढला. यानंतर पीडित मुलगी जखमी अवस्थेत रात्री आठच्या सुमारास घरी आली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. हेही वाचा-ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर रेप, 3 वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी अलीपूर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीचा तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. पोलीस आरोपीला अटक करायला गेले असता, आरोपी पॉर्न पाहात बसला होता. नराधम आरोपी हा एका हॉटेलमधील कामगार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Delhi, Rape on minor

    पुढील बातम्या