Home /News /pune /

पिंपरीत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर बलात्कार, 3 वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

पिंपरीत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर बलात्कार, 3 वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरीत (Pimpri) एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर बलात्कार (rape on beauty parlour businesswoman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    पिंपरी, 18 जानेवारी: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरीत (Pimpri) एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर बलात्कार (rape on beauty parlour businesswoman) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम आरोपीनं पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage and raped) वेळोवेळी लैंगिक शोषण केलं आहे. यासोबतच आरोपीनं पीडित महिलेकडून रोख रकमेसह ऑनलाइन पद्धतीने पैसे घेत, तिची फसवणूक (Financial fraud) केली आहे. मागील तीन वर्षांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. अखेरीस पीडित महिलेनं सांगवी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात फिर्याद दाखल केल आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दीपक आत्‍माराम शेंडगे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो भोसरी येथील रहिवासी आहे. या प्रकरणी 37 वर्षीय फिर्यादी महिलेनं सांगवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही घटस्फोटीत असून त्यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. दुसरं लग्न करण्यासाठी पीडित महिलेनं मॅट्रीमोनिअल साईटवर नाव नोंदणी केली होती. संबंधित वेब साईटवरून पीडितेची आरोपीशी ओळख झाली होती. हेही वाचा-सोबत मरताही नाही आलं, नियतीनं केलं कायमचं वेगळं, बीडमधील कपलसोबत घडलं आक्रीत यानंतर आरोपीनं पीडित महिलेचा विश्वास संपादन करून पीडितेसोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच वेगवेगळी कारणं देत आरोपीनं पीडित महिलेकडून एक लाख 90 हजार रुपये रोख आणि 1 लाख 70 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. एवढेच नव्हे तर आरोपीनं पीडित महिला घरी नसताना, स्वत: जवळील चावीने घर उघडून पीडितेच्या घरातील तीन लाख रुपयांचे दागिने परस्पर घेतले आहेत. हेही वाचा-लग्नासाठी तरुणानं केली हद्द पार, कॉलेजसमोरून 20 वर्षीय तरुणीचं अपहरण केलं अन्... यानंतर आरोपीनं पैसे आणि दागिने परत करण्यास टाळाटाळ करत फसवणूक केली. तसेच तुझे अश्लील फोटो माझ्याकडे आहेत. हे फोटो कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देत ब्लॅकमेल केलं. आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह, ब्लॅकमेल आणि आर्थिक फसवणुकीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pimpri chinchavad, Pune, Rape

    पुढील बातम्या