Home /News /pune /

पुण्यात तरुणांची फिल्मी स्टाईल दहशत, हातात कोयते घेत केला पाठलाग, घटनेचा LIVE VIDEO

पुण्यात तरुणांची फिल्मी स्टाईल दहशत, हातात कोयते घेत केला पाठलाग, घटनेचा LIVE VIDEO

Crime in Pune: पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड (vehicle vandalism) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळस गावठाणमध्ये रात्री 11 च्या सुमारास धुडगूस घातला आहे.

पुणे, 18 जानेवारी: पुण्यात (Pune) पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड (vehicle vandalism) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळस गावठाणमध्ये रात्री 11 च्या सुमारास धुडगूस घातला आहे. 15 ते 20 जणांच्या टोळीने 2 दुचाकी आणि 4 रिक्षांची कोयत्यानं तोडतोड केली आहे. रात्री उशिरा तरुणांनी हैदोस करत परिसरात दहशत निर्माण केली आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV footage) कैद झाली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल (Viral video) होत आहे. याप्रकरणी 15 ते 20 जणांविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळस परिसरात दोन गटात वाद झाल्यानंतर, तरुणांच्या टोळक्याने हातात तलवारी, कोयते आणि अन्य हत्यारे घेत परिसरात दहशत माजवली आहे. आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या फोडत नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. हेही वाचा-एकटं राहणाऱ्या महिलेसोबत घडलं विपरीत, छातीत अन् डोक्यात गोळ्या घालून हत्या रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये काही तरुण हातात प्राणघातक हत्यारे घेऊन धावताना दिसत आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील संशयितांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. हेही वाचा-भावाच्या डोळ्यादेखत 9 जणांनी तरुणावर केले 36 वार; औरंगाबादला हादरवणारी घटना विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी धानोरी परिसरातील मुंजाबा वस्ती येथे आठ ते दहा जणांच्या टोळीनं हातात कोयते, तलवारी, दांडके घेऊन अशाच प्रकारचा धिंगाणा घातला होता. यावेळी आरोपींनी रस्त्यांवरील दुकानं आणि पान टपऱ्यांची तोडफोड केली होती. याबाबत खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे म्हणाले, कोणी गुन्हेगार हातात हत्यारे घेऊन दहशत माजवत असतील, तर त्यांची गय केली जाणार नाही. मुंजाबा वस्ती आणि कळस या दोन्ही प्रकरणाबाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Maharashtra, Pune

पुढील बातम्या