मराठी बातम्या /बातम्या /देश /छत्तीसगडमधील हल्ल्यात तब्बल 700 नक्षलवादी होते सामील, जवानांविरोधात कसा रचला कट?

छत्तीसगडमधील हल्ल्यात तब्बल 700 नक्षलवादी होते सामील, जवानांविरोधात कसा रचला कट?

छत्तीसगडमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत (Encounter With Naxals in Sukma) अनेक जवानांना वीरमरण आलं आहे. आता या घटनेत 200 नव्हे तर 700 नक्षलवादी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

छत्तीसगड 04 एप्रिल : छत्तीसगडमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत (Encounter With Naxals in Sukma) अनेक जवानांना वीरमरण आलं आहे. हा आकडा वाढतच असल्याचं समोर येत आहे. सुरुवातीला 5 नंतर 20 आणि आता 22 जवानांना या चकमकीत वीरमरण आल्याचं समोर आलं आहे. याबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेमध्ये 200 नक्षलवादी सहभागी असल्याचं सुरुवातीला समोर आलं होतं. मात्र, आता या घटनेत 200 नव्हे तर 700 नक्षलवादी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

CRPF सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या घटनेत 22 जवानांना वीरमरण आलं आहे. तब्बल 700 नक्षलवाद्यांचा या घटनेत हात होता. CRPF च्या जवानांना या नक्षलवाद्यांनी चारही बाजूंनी घेरलं होतं. संपूर्ण कट रचून या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. इतकंच नाही तर या कटामध्ये आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधील नक्षलवादीही सामील असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे.

घटनास्थळी जवानांच्या मृतदेहांचा सडा, Ground Report मधून धक्कादायक चित्र समोर

बीजापूर जिल्ह्यातील जोनागुडा परिसरात शनिवारी झालेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील चकमकीत वीरमरण आलेल्या जवानांना आज सीआरपीएफच्या 80 बटालियन बेस कॅम्पमध्ये अंतिम सलामी देण्यात आली. बस्तर एसपी यांच्या उपस्थितीत सीआरपीएफचे उच्चपदस्थ अधिकारी, जगदलपूरचे आमदार व छावणीत उपस्थित स्थानिक लोकप्रतिनिधींनी या जवानांना अखेरचे अभिवादन केले.

First published:

Tags: Chattisgarh, Naxal Attack