Home /News /national /

दिल्ली हिंसाचार : 'आप'चे ताहिर हुसैन यांची पक्षातून हकालपट्टी

दिल्ली हिंसाचार : 'आप'चे ताहिर हुसैन यांची पक्षातून हकालपट्टी

गुप्तचर विभागाचे (Intelligence Bureau) अंकित शर्मा यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली

    नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : दिल्ली पोलिसांनी ताहिर हुसैन यांच्या विरोधात कारवाई केल्यानंतर आता आम आदमी पक्षातून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. गुरुवारी दिल्ली पोलिसांनी आरोपी ताहिर हुसैन (Tahir Hussain) यांच्या चांदबाग स्थित घराला आणि खजूरी खास स्थित कंपनीला सील केले आहे. याशिवाय ताहिर हुसैन यांच्याविरोधात दयालपुर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताहिर यांच्यावर गुप्तचर विभागाचे कॉन्स्टेबल (Intelligence Bureau) अंकित शर्मा यांच्या हत्येचा आरोप आहे. अंकित यांच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे. हल्लेदरम्यान त्यांना 18 वेळा चाकूने भोसकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा - धक्कादायक खुलासा, आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मांच्या शरीरावर चाकूचे 18 वार काय आहे प्रकरण? आम आदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या घरातील काही छायाचित्रामुळे ते संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. ताहिर हुसैन यांच्या घरातून पेट्रोल बॉम्ब, बंदुका, मोठ मोठे दगड, बॅचकी आदी वस्तू जप्त करण्यात आल्या  आहेत. त्यांच्या घराचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये या घरातून सतत दगडफेक व पेट्रोल बॉम्ब येत होते. गुप्तचर विभागाचे कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी या घराच्या छतावर असलेल्या लोकांना शर्मा यांच्या कुटुंबीयांनी जबाबदार ठरविले आहे. आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. 'मला अटक केल्यानंतरही पोलिसांना सहकार्य करीन. माझ्या जीवाला धोका आहे', अशी भीती ताहिर यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली हिंसाचाराचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) देण्यात आला आहे. यामुळे दिल्ली पोलीस गुन्हे शाखेतर्फे (Crime Branch) दोन विशेष तपास पथकांचे गठन करण्यात आले आहे. एसआयटीच्या एक पथकाचे प्रमुख डीसीपी जॉय टिर्की असतील तर दुसऱ्या पथकाचे प्रमुख डीसीपी राजेश देव असतील. हेही वाचा -दिल्ली हिंसाचार : आप नगरसेवकाच्या घरात सापडले पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा खच भाजपच्या कपिल मिश्रांचा आरोप उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसेपूर्वी भडकावू भाषण देण्याचा आरोप असलेले भाजपचे नेते कपिल मिश्रा हे ताहिर हुसैन प्रकरणात आक्रमक झाले आहेत. कपिल मिश्रा यांनी ताहिर हुसैनबरोबरच अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांच्यावर हिंसा भडकावण्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्विट  केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, जर हिंसाचाराच्या दिवसांमधील ताहिर हुसैन यांचे कॉल डिटेल्स समोर आले तर हिंसाचारात आणि अंकित शर्मा यांच्या हत्येमध्ये संजय सिंह आणि अरविंद केजरीवाल यांची भूमिका समोर येईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Delhi violence

    पुढील बातम्या