मराठी बातम्या /बातम्या /देश /

Aadhaar Card Data Protection : 'या' 4 गोष्टीचा उपयोग करून तुम्ही नक्कीच टाळू शकता आधार कार्डचा गैरवापर

Aadhaar Card Data Protection : 'या' 4 गोष्टीचा उपयोग करून तुम्ही नक्कीच टाळू शकता आधार कार्डचा गैरवापर

आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊ या.

आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊ या.

आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊ या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 सप्टेंबर:   आधार कार्ड हे एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. त्यामुळे आता ते रेशन कार्ड, पॅन कार्डसह इतर काही कागदपत्रं आणि खात्यांशी लिंक करणं अनिवार्य करण्यात आलंय. आधार कार्डचा वापर वाढल्याने त्याचा गैरवापर होण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार नागरिकांच्या आधार कार्डचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक तर करत आहेतच, पण काही गुन्हेगारी कारवायांमध्येही त्याचा वापर करत आहेत. दरम्यान, आधार युझर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने केला आहे; पण तरीही काही जणांच्या आधार कार्डचा गैरवापर होत आहे. बहुतेकशा प्रकरणांमध्ये हा गैरवापर आधार युझर्सच्या निष्काळजीपणामुळे होतो. आधार युझर्सनी सतर्क राहून काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणीही त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करू शकत नाही, असं डेटा सुरक्षा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊ या.

टू फॅक्‍टर ऑथेंटिकेशन

आधारचा गैरवापर रोखण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग म्हणजे तुमचा मोबाइल नंबर आणि ई-मेल त्याच्याशी लिंक असायला हवा. असं केल्यास आधार व्हेरिफिकेशनसाठी वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपीची आवश्यकता असेल आणि तो ओटीपी आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवरच येईल. OTP शिवाय आधारचं व्हेरिफिकेशन करता येत नाही. अशा प्रकारे तुम्ही आधार कार्डचा गैरवापर टाळू शकता.

हेही वाचा - गाडी चालवताना Bluetooth Earphone वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

मास्‍क्‍ड आधार कॉपीचा वापर

आधार कार्डची फोटोकॉपी देण्याची गरज असल्यास मास्‍क्‍ड आधार कार्डची फोटोकॉपी द्यावी. मास्‍क्‍ड आधार कार्डमध्ये संपूर्ण आधार क्रमांक नसतो, त्यात फक्त शेवटचे चार अंक असतात. याच्या मदतीने आधार व्हेरिफिकेशन केलं जातं; मात्र पूर्ण आधार क्रमांक न दाखवल्याने त्याचा कोणीही गैरवापर करू शकत नाही.

बायोमेट्रिक्स लॉक ठेवा

बायोमेट्रिक्स लॉक करूनही तुम्ही तुमचं आधार कार्ड सुरक्षित करू शकता. बायोमेट्रिक्स लॉक म्हणजे अंगठा, बोटं आणि डोळ्यांची बुब्बुळं यांच्या प्रतिमा तुमच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू शकत नाही. UIDAI च्या वेबसाइटला भेट देऊन कोणीही आपलं बायोमेट्रिक्स लॉक करू शकतात. बायोमेट्रिक्स लॉक केल्यानंतरही ओटीपी आधारित ऑथेंटिकेशन सुरू राहतं. बायोमेट्रिक्स तात्पुरतं किंवा कायमचं लॉक केलं जाऊ शकतं.

व्हर्च्युअल आयडेंटिटी बनवा

व्हर्च्युअल आयडेंटिटीमध्ये आधार नंबर लपविला जातो आणि तात्पुरता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी तयार केला जातो. यामध्ये युझरचा आधार क्रमांक सांगितला जात नाही. परंतु त्याची ओळख प्रमाणित केली जाते. VID फक्त काही काळासाठीच वैध असतं. आधार पोर्टल किंवा एम-आधारवरून व्हर्च्युअल आयडेंटिटी तयार केली जाऊ शकते.

अशा रीतीने तुम्ही तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होण्यापासून रोखू शकता.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link, UIDAI